26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeनांदेडवर्ष लोटले तरी लसीकरणाचे उद्दीष्ट अपूर्णच

वर्ष लोटले तरी लसीकरणाचे उद्दीष्ट अपूर्णच

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
देशातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास जवळपास एक वर्षे पुर्ण झाले असु, अद्यापही अनेक लाभार्थ्यांनी कोरोनाची पहीलीच लस घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. तर नांदेड शहरातही कोरोनाच्या लसीकरणास नागरीकांचा प्रतिसाद अल्प मिळत असल्याने जिल्हा प्रशासनाला केवळ ७० टक्के नागरीकांचे लसीकरण करण्यात यश आले आहे. त्यामुळे अद्यापही ३० टक्के नागरीक लस न घेता बेजबाबदार पणे वावरताना दिसत आहेत.

गत दोन वर्षापासून कोरोना विषाणूने संपुर्ण जगात थैमान घातले असुन, देशात लाखो लोकांचे कोरोनाने बळी घेतले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाच्या दोन लाटा येवून गेल्या. तर सध्या अचानक कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने तीस-या लाटेसही सुरूवात झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. कोरोना विषाणूवर लस शोधण्यासाठी वैज्ञानिकांना जवळपास एका वर्षाचा वेळ खर्च करावा लागला होता. लसीचा शोध लागल्यानंतर जानेवारी २०२१ पासुन आपल्या देशात लसीकरणाच्या पहील्या टप्प्यास सुरूवात करण्यात आली. ज्यात ६० वर्षावरील नागरीकांना लसीचा पहीला डोस देण्यात आला तर यानंतर दुस-या टप्प्यात ४५ वर्षावरील, तिस-या टप्प्यात १८ वर्षावरील नागरीकांना लस देण्यात आली. तर आता सध्याला १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरणास सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर मागच्या वर्षभरापासुन लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शंभर टक्के लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात आरोग्य कर्मचा-याकडून घरोघरी लसीकरण केले जात आहे.

महापालिका हद्दीत ४ चार लाख ८० हजार ९०० नागरीकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट असुन आतापर्यंत ३ लाख ३७ हजार १८२ नागरीकांनी लसीचा पहीला डोस घेतला तर आतापर्यत २ लाख २८ हजार ९७ नागरीकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे पहीला डोस ७० टक्के तर दुसरा डोस केवळ ४६ टक्के नागरीकांनीच घेतला आहे. आजरोजी मनपा हद्दीतील १ लाख ४३ हजार ७१८ नागरीकांनी लसीचा पहीला डोस तर २ लाख ५२ हजार ८०३ नागरीकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. तर सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरणास सुरूवात झाली असुन जवळपास ३२ हजार ९८५ एवढ्या लाभार्थ्यांचे लसीकरणाचे उद्दीष्ट असुन त्यापैकी ६१ टक्के म्हणजे २० हजार २३३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच दोनही लस घेतलेल्या नागरीकांना बुस्टर देण्यात येत आहे ज्यात १५ हजार ८०५ नागरीकांचे लसीकरण होणे अपेक्षीत असुन या पैकी केवळ २०.५ टक्के नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे. बुस्टर डोसचे १२ हजार ५५५ लाभार्थ्यांनी अद्याप लस घेतली नाही. दरम्यान शंभर टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाकडून फिरते पथक नेमण्यात आले आहेत. सदर पथक पेट्रोल पंप, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठा आदी ठिकाणी नागरीकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तर शासकीय कार्यालयातही नागरीकांना विना लस भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या