18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडविद्यापीठात जीवनसाधना गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

विद्यापीठात जीवनसाधना गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

एकमत ऑनलाईन

नांदेड:प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त दि. १ व २ डिसेंबर रोजी जीवनसाधना गौरव पुरस्कारासह अनेक पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावर्षी २०२० आणि २०२१ अशा दोन वर्षांचे पुरस्कार वितरीत होणार असून या सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची उपस्थिती होती.

दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वा. विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. या दिवशी २०२० आणि २०२१ अशा दोन वर्षाच्या पुरस्काराचे वितरण होणार आहे. जीवनसाधना पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट संकुल व तरुण संशोधक पुरस्कार आणि उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी पुरस्कार देण्यात येणार आहेत

. दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार देण्यात येणार आहेत. या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून नांदेड परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी असणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन असणार आहेत. दि. २ डिसेंबर रोजी परीक्षा विभागातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना दिले जाणारे विविध पुरस्कार, विद्यार्थी विकास विभागातर्फे दिले जाणारे पुरस्कार, क्रीडा विभागातर्फे दिले जाणारे पुरस्कार, राष्ट्रीय सेवा विभागातर्फे दिले जाणारे पुरस्कार, विद्यापीठ कर्मचा-यांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा आणि उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचे वितरण या समारंभात करण्यात येणार आहे. असे विद्यापीठ प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या