29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeनांदेडश्रीनगर भागातील खून प्रकरणात दोघे गजाआड

श्रीनगर भागातील खून प्रकरणात दोघे गजाआड

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
श्रीनगर भागात एका युवकाचा झालेला मृत्यू हा खूनच होता, हे सिध्द झाले आहे़ काही तासातच भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणातील धागेदोर शोधून काढत दोन आरोपींना गजाआड केले आहे.शहरातील श्रीनगर भागातील महारुर्द्र हनुमानमंदिर जवळ असलेल्या एका घराच्या गच्चीवरून राधेशाम अग्रवाल (२३) हा युवक गच्चीवरून पडला अशी माहिती भाग्यनगर पोलीस ठाण्यास ७ फेबु्रवारी रोजी सकाळी ५़३० वाजता मिळाली होती.

त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. तोच सायंकाळी ५ वाजता नवीनच माहिती वैद्यकीय अहवालात आली, यात राधेशाम अग्रवालच्या पोटात चाकुने वार करण्यात आले असे उघड झाले होते. त्यानुसार पोलिसांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून सत्य पुढे आणले आहे.

पोलीस निरिक्षक सुधाकर आडे, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांच्यासह सहका-यांनी घटनास्थळी घेतलेली माहिती व स्थानिक गुन्हा शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांनी एक एक पुरावे जमा करीत राधेशाम याचा खून करणारे आणि याच गल्लीत राहणारा आकाश पालीमकर ३० व आदिनाथ मोरे या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान आकाश पालीमकर हा सध्या आपल्या कुटूंबासोबत हैद्रार्बाद येथे राहतो पण काही महिन्यांपुर्वी तो याच गल्लीत राहत होता आणि त्यावेळेस घडलेल्या गंभीर प्रकारानंतर राधेशाम अग्रवालचा खून झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या