29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडसंक्रांतीच्या दिवशी ५५३ कोरोना रूग्णांची भर

संक्रांतीच्या दिवशी ५५३ कोरोना रूग्णांची भर

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढत आहे. दिवसभरात पाचशेच्या आसपास नवे रूग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात आले असले तरी कोरोनाचे आकडे भेडसवणारे आहेत. शुक्रवारी प्राप्त झालेल्या १ हजार ६५८ अहवालापैकी ५५३ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४७५५ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७८ अहवाल बाधित आले आहेत. त्यामुळे हे आकडे नांदेडकरांची चिंता वाढवणारे ठरत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरीकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९२ हजार ७४२ एवढी झाली असून यातील ८८ हजार २२६ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १ हजार ८६१ रुग्ण उपचार घेत असून ३ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६५५ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा २९०, नांदेड ग्रामीण ३१, अधार्पूर ७, भोकर ५, देगलूर १, धमार्बाद ३, हदगाव ५, हिमायतनगर १, कंधार १९, किनवट २५, लोहा १२, माहूर २, मुदखेड १, मुखेड १६, नायगांव ४, उमरी २, अमरावती ७, औरंगाबाद १, पुणे ३, हिंगोली ९, परभणी २०, नागपूर १, वर्धा १, वाशिम ३, यवतमाळ १, कोल्हापूर १, निजामाबाद २, पंजाब २ तर अँटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा २२, नांदेड ग्रामीण ४, भोकर २, बिलोली ७, देगलूर ३, धमार्बाद ७, कंधार ३३, किनवट १०, लोहा १, माहूर २, मुदखेड २, मुखेड ९, नायगाव ६ असे एकूण ५५३ कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ९, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १०६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १०, खाजगी रुग्णालय १, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण २ कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. आज १ हजार ८६१ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी १७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ५, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ३८९, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण १ हजार ४३२, खाजगी रुग्णालय १८ अशा एकुण १ हजार ८६१ व्यक्ती उपचार घेत आहेत. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१३ टक्के आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या