27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडसमाजशास्त्र विषयात काम करण्याच्या अनेक संधी

समाजशास्त्र विषयात काम करण्याच्या अनेक संधी

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
समाजातील विविध प्रश्न आणि समस्यांची जाणीव ठेवण्यासाठी समाजशास्त्र हा विषय खूप उपयुक्त आहे कारण या विषयामुळे जीवनातील अनेक संधी आपल्याला प्राप्त करता येतात. मानवी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर विविध प्रकारच्या काम करण्याच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन डॉ.बाळासाहेब नरवाडे यांनी केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने दि.१२ एप्रिल रोजी या समाजशास्त्रातील करिअर संधी विषयावर इंदिरा गांधी महाविद्यालय सिडको नांदेड येथे डॉ. नरवाडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.नरवाडे म्हणाले की, उच्चपदस्थ अधिकारी ते अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत समाजशास्त्र या विषयाचा उपयोग ज्ञान आणि विविध सामाजिक भूमिका वठविण्यासाठी होतो. एमपीएससी यूपीएससी स्टाफ सिलेक्शन बोर्ड रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आणि अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये समाजशास्त्र या विषयाच्या अध्ययनामुळे संधी निर्माण होण्यास मदत होते. याप्रसंगी समाजशास्त्र विषयाचे महत्त्व अधोरेखित करत असताना समाजशास्त्र विषय प्रत्येक व्यक्तीला माणूस बनून समाजजीवन शिकण्याचे कौशल्य प्राप्त करून देतो असे विचार मांडले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बिभीषण करे होते. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्रा. सौ. शालिनी वाकोडकर यांनी केले. सूत्रसंचालन जया उजागरे या विद्यार्थिनीने तर आभार प्रदर्शन कु. पूजा सुपेकर यांनी केले. कार्यक्रमास प्रा. दत्ता बडूरे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओंकार वावधने मनीषा पांचाळ पूजा सुपेकर रोहन नांदेडकर आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांबरोबर इतरही सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या