27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडहिमायतनगर शहरात गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी रिमझिम पावसाचे आगमन..

हिमायतनगर शहरात गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी रिमझिम पावसाचे आगमन..

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर- कोरोणा संकटानंतर यंदा सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या आनंदात व हर्ष उल्हासात ठिकठिकाणी साजरा होत असल्याचे दिसून आले दिनांक 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या पावन-पर्वावर अनेक गणेश भक्तांनी ढोल ताशाच्या गजरात मूर्ती पूजेचे साहित्य खरेदी करून मोठ्या आनंदात बाप्पाचे स्वागत केले त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वरून राज्याने सुद्धा रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने शहरातील शेतकरी राजा सुद्धा सुखावल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले..

हिमायतनगर शहरात ठीक ठिकाणी गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करीत दिनांक 31 ऑगस्ट रोजी बापाचे मोठ्या आनंदात आगमन झाले दरवर्षी परमेश्वर बस स्टँड परिसरात गणेश मूर्ती विक्रेते राम खडके यांनी आकर्षक अशा गणरायाच्या मुर्त्याचे स्टॉल थाटून गणेश भक्तांना त्या उपलब्ध करून देत असल्याचे पाहायला मिळाले तर शहरातील प्रशांत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील आकर्षक शोभयात्रा व आगमन सोहळ्याची जय्यत तयारी करून स्वागत केले असल्याचे पाहायला मिळाली कोरोनाच्या संकटामुळे गेले दोन वर्ष सार्वजनिक रित्या कोणताच सण आपल्याला साजरा करता आले नाहीत.

त्यामुळे यावर्षी या संकटाची तीव्रता कमी झाल्याने शासनाने सर्व निर्बंध क्षितिज केल्याचे सांगितल्यानंतर यंदाचा गणेश उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होत असल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे अनेक गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी बाप्पाचे आगमन ते विसर्जन या दहा दिवसाच्या कालावधीत शहरा सह तालुक्यातील ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्ताची तयारी सुरू करून पोलीस यंत्रणा सज्ज केली असल्याचे आज पथसंचलन करून सांगितले

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या