26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeनांदेड२१ डिसेंबरला मतदान; २२ रोजी मतमोजणी

२१ डिसेंबरला मतदान; २२ रोजी मतमोजणी

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड-वाघाळा महापालिकेच्या एका रिक्त सदस्य पदाच्या पोटनिवडणुकांसाठी दि.२१ डिसेंबरला मतदान होणार आहे.तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.नांदेडसह राज्यातील अन्य तीन महापालिकेच्या ही रिक्त पदांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी जाहीर केला आहे.

काही दिवसापुर्वी राज्यातील एकमेव देगलूर विधानसभा मतदार संघासाठी निवडणुक पार पडली.यानंतर चार ते पाच दिवसापुर्वी जिल्हयातील माहूर,नायगाव,अर्धापूर व हिमायतनगर येथील नगर पंचायतसाठी आरक्षण सोडतची प्रक्रिया सुरू झाली आहे.तोच नांदेड वाघाळा महापालिकेच्या प्रभाग १३ अ मधील एका रिक्तपदासाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. मदान यांनी,या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील,असे सांगीतले तर नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारले जातील. ५ डिसेंबर रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर पर्यंत असेल. निवडणूक लढविणा-या उमेदवारांना १० डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २२ डिसेंबर २०२१ रोजी होईल. राज्यातील धुळे ५ ब, अहमदनगर ९ क, नांदेड वाघाळा १३ अ आणि सांगली मिरज कुपवाड प्रभाग १६अ च्या रिक्त पदासाठी पोटनिवणुक होत असल्याचे निवडणूक आयुक्त मदान यांनी जाहीर केले आहे.

नांदेड-वाघाळा महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. यामुळे शहरातील प्रभाग १३ अ येथे एका रिक्त पदासाठी होणा-या जागेवर कोणाला संधी मिळते. याकडे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे प्रभागातील आणि प्रभा बाहेरील काही इच्छुकांनी मोर्चेबांधनी सुरु केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या