29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेड७00 गुण घ्या ५0 लाख मिळवा

७00 गुण घ्या ५0 लाख मिळवा

एकमत ऑनलाईन

नांदेड : विशेष प्रतिनिधी
देशात सर्वत्र कोचिंग क्लासेसने थैमान घातले आहे. शैक्षणिक संस्थेपेक्षा आता कोचिंग क्लासेसची चलती झाली आहे. लाखो रुपये खर्च करुन विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी अनेक नेते मंडळींनी शैक्षणिक संस्था निर्माण केल्या असल्या तरी आजघडीला मात्र देशभरात सर्वत्र शैक्षणिक संस्थेपेक्षा कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांची भरमसाठ संख्या पहावयास मिळत आहे. याचे एकमेव कारण शिक्षण माफियांतील प्रमुख मंडळी कुठल्याही महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने ७00 पेक्षा जास्त गुण घेतल्यास त्याला ५0 लाख रुपये देवून आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेतल्याचे दर्शवित मोठ्या प्रमाणात खोटी जाहिरातबाजी सुरु केल्यामुळे सर्वत्र धुमाकूळ उडाला आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, फारपुर्वी शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकाला खाजगी शिकवण घेता येत नव्हती. यासाठी कायदे निर्माण करण्यात आले होते. परंतु कालांतराने छुप्या मार्गे अनेक प्राध्यापकांनी खाजगी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. हळुहळु शिकवणीचे रुपांतर व्यवसायात झाले. अनेकांनी खाजगी नोक-या सोडून कोचिंग क्लासेस काढले. आजघडीला सर्वत्र शिक्षण संस्थेपेक्षा कोचिंग क्लासेसचे पेव निर्माण झाले आहे.

या स्पर्धेत टिकण्यासाठी अनेकांनी हुशार असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडे लागेबांधे सुरु केले. तुम्ही कुठल्याही महाविद्यालयात शिका आपण जर ७00 पेक्षा जास्त गुण प्राप्त केल्यास आमच्या शिकवणीमध्ये हा विद्यार्थी होता हे सांगण्यासाठी आपणास ५0 लाखापेक्षा जास्त रक्कम दिल्या जाईल असे सांगून अगोदरच अ‍ॅडव्हास बुंिकंग केल्या जात आहे. यामुळे हुशार विद्यार्थ्यांच्या पालकांची चलती होत असली तरी त्यांच्या खोट्या जाहिरातीमुळे इतर विद्यार्थ्यांच्या पालकांवर व विद्यार्थ्यांवर भुरळ पडत आहे. विद्यार्थी देखील पालकाकडे हट्ट धरुन तुम्हाला अमूक अमूक कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश द्या असे सांगत आहेत.

वेळीच या शिक्षण माफियांवर नियंत्रण आणले नाही तर भविष्यात फारमोठे नुकसान विद्यार्थ्यांसह पालकांचे होणार आहे. विद्यार्थ्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, कापड दुकानात, मॉल आदि ठिकाणी वस्तु खरेदीवर बक्षिस दिल्या जात आहे त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आता बाजार झाला आहे. कोचिंग क्लासेसवाले थेट चांगले मार्क मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना अमिष दाखवित असल्याचे उघड होत आहे.

खोट्या जाहिरातबाजीवर वेळीच लगाम बसविणे आवश्यक आहे. यासाठी इतर कोचिंग क्लासेसने देखील एकत्रीत येवून बड्या माशाला धडा शिकवणे आवश्यक आहे अन्यथा इतर कोचिंग क्लासेसवाले उपाशी मरतील यात शंका नाही. यानिमित्ताने बलाढ्य आणि सामान्य कोचिंग क्लासेस असे दोन वर्ग आता निर्माण झाले आहेत. याचा स्फोट कधी होईल हे सांगता येणार नाही. भविष्यात नजिकच्या काळातच हा स्फोट आपण सर्वच डोळ्यानेच पाहणार हे तेवढेच सत्य.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या