नांदेड : स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने रस्त्यावर वाहन चालवितांना अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना दवाखाण्यात नेणे व त्यांना मदत करणा-या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
दररोज अनेक रस्ते अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागतो़ तर अनेक जण गंभीर जखमी होत असतात़ मात्र या लोकांना वेळवर मदत तथा उपचार न मिळाल्याने रस्त्यावरच व्हिवळत पडावे लागते़ परंतू शासनाने अपघातात जखमी झालेल्या लोकांना मदत करणा-या व्यक्तींचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे़.
अशा वाहन अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना आपण मदत केली असल्यास त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक किंवा पोलीस विभागाकडून निर्गमीत करण्यात आलेले प्रमाणपत्र किंवा वर्तमानपत्रात आलेल्या बातमीसह आपली माहिती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयास शनिवार ९ जुलपर्यंत सादर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केली आहे.