25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeनांदेडप्राचार्यांची प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी! माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या संस्थेतील प्रकार

प्राचार्यांची प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी! माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या संस्थेतील प्रकार

एकमत ऑनलाईन

नांदेड, 27 जुलै : शिक्षकांकडे समाज नेहमीच चांगल्या नजरेने पाहतो. विद्यामंदिरातून देश घडवणारे विद्यार्थी बाहेर पडतात. अशात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या शारदा भवन शिक्षण संस्थेतील प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यशवंत महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी प्राध्यपकांनी आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केली होती.

काय आहे घटना?
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेतील एका प्राचार्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड मधील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी महिला प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केली. तशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. त्यावरून नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या श्री शारदा भवन शिक्षण संस्थेतील यशवंत महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्राचार्य सातत्याने अश्लील बोलून त्रास देत होते. पण, आता थेट त्यांनी हात धरून शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यास अन्य ठिकाणी बदली करू अशी धमकी दिली. अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. त्यावरून शिवाजी नगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

माजी मंर्त्यांच्या शिक्षण संस्थेतच धक्कादायक घटना
महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेत ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. या संदर्भात अद्याप अशोक चव्हाण यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र, अशोक चव्हाण काय कारवाई करतात? याकडेही आता लोकांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे पोलीस काय कारवाई करतात हे पाहणेही महत्त्वाचे आहे. अद्यापतरी प्राचार्यांना अटक करण्यात आलेली नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या