24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeनांदेडवर्षभरात २७ शेतक-यांनी मृत्युला कवटाळले

वर्षभरात २७ शेतक-यांनी मृत्युला कवटाळले

एकमत ऑनलाईन

…………………….. कंधार : हबीब सय्यद ……………………..
दुष्काळ, कर्जमाफी आणि नापिकीच्या दुष्टचक्रातून शेतक-यांची सुटका होणे अशक्य झाले आहे. याच दुष्ट चक्राला कंटाळून गत वर्षभरात २७ शेतक-यांनी आत्महत्या करून मृत्युला कवटाळले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखाची शासकीय मदत दिली जाते. मात्र, ती मदतही चौकशीच्या आणि अपात्रतेच्या फे-यात अडकत असल्याने अनेक कुटुंबाला याचा फटका बसला आहे.

केंद्र शासन व राज्य शासन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविते. परंतु दरवर्षी ग्रामीण भागातील शेतक-याचा कर्जबाजारीपणा, आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढतच जात आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांत ऐन खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसत आहे. रब्बी हंगामातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्ज काढून पेरणी करणे, पीक वाचविण्यासाठी अथक मेहनत करूनही कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही यामुळे शेतकरी कमालीचे अडचणीत येत आहेत. या दृष्ट चक्राला कंधार तालुकाही अपवाद ठरला नाही. गत वर्षभरात दि. १२ जानेवारी २०२१ ते २७ जून २०२२ या कालावधीत २७ शेतक-यांनी आत्महत्या करून मृत्युस कवटाळले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान पिक विमा योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, मृदा आरोग्य कार्ड योजना, शरद पवार ग्राम समृद्धी योजना, दुग्ध व्यवसाय योजना, शेळी पालन योजना, कुक्कुटपालन योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना,

शेततळे योजना, परंपरागत कृषी विकास योजना अशा प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची लागणारी माहिती गाव पातळीवर पोहोचत नाही. या सगळ्या योजनांची माहिती ग्रामपंचायत या ठिकाणी गाव पातळीवरून अर्ज करून घेतले तर याचा तळागाळातील शेतक-यांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. मात्र या सगळ्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागात इंटरनेट, नेटवर्क सह इतर विविध अडचणीमुळे ऑनलाईन ची तारीख केव्हा येते व केव्हा जाते,याची जाणीव होत नसल्याचे या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. अलीकडच्या काळात सरकारने ब-याच योजना ऑनलाईन केल्यामुळे त्या बँक हॅन्ड सबसिडीवर आहेत. पूर्वी या योजनांचे अनुदान वेळेवर मिळायचे. आता मात्र शेतक-यांना आधी संपूर्ण खर्च करावा लागतो नंतर कधीतरी अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, असे शेतकरी कांताराम आगलावे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या