अधार्पूर : कोरोना प्रतिबंधक लसीचे जिल्ह्यातील अधार्पूर, भोकर, हदगाव, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, किनवट आदी तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरण सुरू आहे. मात्र या लसीकरणाला अनेक गैरसमजुतीचा मुलामा चढविण्यात येत आहे. तरीही आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण १ लाख २९ हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत असून अनेक नागरिक लसीकरणाकडे वळले आहेत. आज जितक्या लोकांनी लस घेण्याची तयारी दाखवली आहे. तितक्या प्रमाणात लसीची उपलब्धता होत असली तरी या लसीकरणाबाबत अनेक समज गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामुळे या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या साधारणता ३३ लाखाच्या वर आहे. त्यापैकी ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांच्या पुढील वय असलेल्या नागरिकांनी आतापर्यंत केवळ १ लाख २९ हजार ३१७ लोकांचेच लसीकरण होऊ शकले आहे. कोरोना संसगार्पासून बचाव करण्यासाठी सुरक्षित असलेली ही लस सर्व पात्र लोकांनी घेण्याची गरज आहे.
४५ वषार्पेक्षा पुढील नागरिकांना लस घेण्याची मूभा
कोरोना महामारी संसर्ग टाळण्यासाठी प्रथम फ्रंटलाईन वन, नंतर जेष्ठ नागरिक आणि आता ४५ वर्षावरील वय असलेल्या सर्वांसाठी कोरोना प्रतिबंध लसीकरणाची दारे उघडी झाली आहेत. शासकीय रुग्णालयासोबत अनेक खाजगी रुग्णालयातूनही ही सुविधा दिली जात आहे. नांदेड जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावरही कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. कोवीशिल्ड किंवा कोवॅक्सीन या दोन प्रकारच्या लसी नांदेड जिल्ह्यात वापरल्या जात आहेत.
१ लाख २९ हजार ३१७ लोकांनी लस घेतली
जिल्ह्यातील तालुकास्तर आणि ग्रामीण भागातही प्रशासकीय स्तरावर लसीकरण मोहिमेची जोरदार तयारी करण्यात आली असली तरी काही गैरसमजुतीमुळे लस टोचून घेण्यास बरेच लोक धजावत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी स्वत: होऊन लसीकरणासाठी सेंटरवर जाणे आवश्यक असले तरी अशा लोकांचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात केवळ १ लाख २९ हजार ३१७ लोकांनी लस घेतली असल्याची माहिती आहे.
दरम्यान कोरोना लसीच्या चाचण्या चालू होत्या. त्यावेळी म्हणजे सात महिन्यापूर्वी लस टेचून घेणारे बारडचे प्रा. रुपेश देशमुख बारडकर यांनीही याबाबीकडे लक्ष वेधले आहे. आपल्याला कोरोनापासून सुरक्षित रहायचे असेल, लॉकडाऊन नको असेल, तर लसीकरण करून घेऊन स्वत:ला व समाजाला सुरक्षित करा असा सल्ला त्यांनी दिला आहे. संशोधकांनी खूप मेहनतीने बनविलेली ही लस अगदी सुरक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
सध्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक ग्रामस्तरावर कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी शिबीर घेतले जात आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने गावोगावी जाऊनही कोरोना प्रतिबंध लस देण्यासाठी लोकांना आवाहन केले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाचे राज्य संघटक डॉ. यु. डी. इंगळे यांनी केले आहे.