23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeनांदेडमनपाच्या पथकाकडून १ क्विंटल प्लॉस्टिक जप्त

मनपाच्या पथकाकडून १ क्विंटल प्लॉस्टिक जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : महानगरपालिकेच्या पथकाने अचानक छापा घालून किसान फॅशन मॉल व डिमार्ट येथून जवळपास १ क्विंटल प्लॉस्टिक जप्त केले़या दोन्ही व्यावसायीक प्रतिष्ठानांकडून १० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. गेल्या काही महिन्यात मनपाने मोठ्या व्यावसायीकांवर ही कारवाई केली आहे.

शासनाने एकल प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे़ या निर्णयाची दि़ १ जुलैपासून शहर व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरात कारवाईसाठी महापालिकेचे विविध पथक सक्रिय झाले आहेत. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी धडक कारवाई सुरू करण्यात आली असून मनपाच्या पथकाने दि. ४ जुलै रोजी आयटीआय कॉर्नर येथील किसान फॅशन मॉल आणि बिग बाजार येथील डीमार्ट या दोन मोठ्या व्यावसायीकांच्या प्रतिष्ठानवर छापा टाकला.

यावेळी पथकाने शासनाकडून प्रतिबंधीत असलेले जवळपास १ क्विंटल प्लास्टिक येथून जप्त केले़शासन आदेशाचा भंग केल्यामुळे किसान मॉल आणि डीमार्ट या दोघांना प्रत्येकी ५ हजार रुपये असा १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर राडा-रोडा टाकून उपद्रवकारक कृत्य करणा-या सात नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करून त्यांच्याकडून साडेचार हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

यापुढे सुध्दा शहरात प्लॉस्टिक वापरणारे व्यावसायीक प्रतिष्ठान, नागरीक यांच्यावर सुध्दा कार्यवाही केली जाणार आहे. रस्त्यावर राडा रोडा अर्थात बांधका साहित्य व इतर साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-यांविरुध्द कार्यवाही होणार आहे.

ही कारवाई मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त डॉ.बाबासाहेब मनोहरे, गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुंकेवार यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय अधिकारी राजेश चव्हाण, रमेश चवरे, डॉ.रईसोद्दीन, मुख्य स्वच्छता निरिक्षक वसीम तडवी, स्वच्छता निरिक्षक मोहन लांडगे, संजय जगतकर, शेख नईम, किशन वाघमारे, किशन तारु, विजय वाघमारे यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या