29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात १ हजार ३७२ व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड जिल्ह्यात १ हजार ३७२ व्यक्ती कोरोना बाधित

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात प्राप्त झालेल्या कोरोनाच्या अहवालानूसार ४ हजार ५४९ अहवालापैकी १ हजार ३७२ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर २५ जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू झाला आहे. नव्या बाधितात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ८८३ तर अँटिजेन तपासणीद्वारे ४८९ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ७१ हजार ७९१ एवढी झाली असून यातील ५५ हजार ९८० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १४ हजार २२८ रुग्ण उपचार घेत असून २३९ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ४४०, बिलोली २५, कंधार १, मुखेड ३६, माहूर १, हिंगोली ६, नांदेड ग्रामीण ५३, देगलूर ३०, किनवट ३७, नायगाव ३४, यवतमाळ २, अधार्पूर ५२, धमार्बाद ३७, लोहा ४८, उमरी २५, आदिलाबाद २, भोकर १८, हिमायतनगर २५, मुदखेड ७, हदगाव ३, परभणी १ असे एकूण ८८३ बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा ४९, बिलोली ३२, हिमायतनगर ८७, माहूर १३, उमरी १५, नांदेड ग्रामीण ८, देगलूर ३९, कंधार २७, मुदख्खेड १९, परभणी २, अधार्पूर ६, धमार्बाद ३४, किनवट ५७, मुखेड ५१, हिंगोली ८, भोकर ६, हदगाव १०, लोहा ८, नायगाव १६, यवतमाळ २ असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ४८९ बाधित आढळले.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी २०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ५४९, भोकर तालुक्याअंतर्गत २३, देगलूर कोविड रुग्णालय ७, नायगाव तालुक्यातंर्गत 2, उमरी तालुक्यातंर्गत १४,बिलोली तालुक्यातंर्गत ५९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३२, मुखेड कोविड रुग्णालय १३७, कंधार तालुक्यातंर्गत १२, किनवट कोविड रुग्णालय १७, हिमायतनगर तालुक्यातंर्गत २४, बारड कोविड रुग्णालय २, अधार्पूर तालुक्यातंर्गत २४, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय २८, हदगाव कोविड रुग्णालय ५२, माहूर तालुक्यातंर्गत ३६, धमार्बाद तालुक्यातंर्गत २३, लोहा तालुक्यातंर्गत ५२ खाजगी रुग्णालय १0६ यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एककुण १४ हजार २२८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. आज १ हजार २१९ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण ६ हजार २६६,नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ३ हजार ६८९,खाजगी रुग्णालय १ हजार ९१८,हैदराबाद येथे संदर्भित १ एकूण १४ हजार १०० रुग्ण उपचार घेत आहेत. सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे ५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ११ खाटा उपलब्ध आहेत.

राजकारण जोमात, जनता कोमात!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या