नांदेड : जिल्ह्यात २0२ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना बुधवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर १0३ व्यक्तींचे अहवाल बाधित आले असून उपचार घेणा-या दोघांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एकुण १ हजार ३८0 अहवालापैकी १ हजार २५४ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १८ हजार ३९४ एवढी झाली असून यातील १६ हजार ५0३ बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण १ हजार २७७ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ४५ बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे.
या अहवालात दोघाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवार २0 ऑक्टोंबर रोजी बिलोली तालुक्यातील आरळी येथील ४0 वषार्चा एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी इतवारा नांदेड येथील ५७ वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या ४९२ झाली आहे. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे ५, अधार्पूर कोविड केंअर सेंटर ५, किनवट कोविड केंअर सेंटर ११, धमार्बाद कोविड केंअर सेंटर ९, मुदखेड कोविड केंअर सेंटर ४, मुखेड कोविड केंअर सेंटर ८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ५, बिलोली कोविड केंअर सेंटर ३, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन १0६, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर ४, लोहा कोविड केंअर सेंटर २, खाजगी रुग्णालय ४0 असे २0२ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९२.८१ टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३२, भोकर तालुक्यात १, मुखेड १, धमार्बाद १, परभणी २, नांदेड ग्रामीण ३, किनवट २, नायगाव २, हिंगोली १ असे एकुण ४५ बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३१, अधार्पूर तालुक्यात ३, माहूर ६, बिलोली २, कंधार ३, धमार्बाद १, यवतमाळ १, नांदेड ग्रामीण १, किनवट २, हदगाव १, नायगाव १, मुखेड ४, उमरी असे एकूण ५८ बाधित आढळले. जिल्ह्यात १ हजार २७७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.
यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १६२, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित ६९४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ४२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे ४७, हदगाव कोविड केअर सेंटर ११, नायगाव कोविड केअर सेंटर येथे २७, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १८, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ३, मांडवी कोविड केअर सेंटर ७, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे ६, लोहा कोविड केअर सेंटर येथे ८, बारड कोविड केअर सेंटर २, मुदखेड कोविड केअर सेटर ४, माहूर कोविड केअर सेंटर २१, किनवट कोविड केअर सेंटर येथे ३४, धमार्बाद कोविड केअर सेंटर १५, उमरी कोविड केअर सेंटर ११, कंधार कोविड केअर सेंटर येथे ९, अधार्पूर कोविड केअर सेंटर १४, भोकर कोविड केअर सेंटर ११, हिमायतनगर कोविड केअर सेंटर १, खाजगी रुग्णालयात दाखल १२७, लातूर येथे संदर्भीत १, हैद्रबाद येथे संदर्भीत २ झाले आहेत. बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी ५.३0 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे ७४, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे ९0, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ७९ एवढी आहे.
कोणाच्या जाण्यानं पक्ष संपत नाही, पक्ष सोडताना कोणालातरी ‘व्हिलन’ ठरवावे लागते ! -फडणवीसांचा पलटवार