27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडउमरी येथील शिबिरात १०५ जणांनी केले रक्तदान

उमरी येथील शिबिरात १०५ जणांनी केले रक्तदान

एकमत ऑनलाईन

उमरी : उमरी येथील मुस्लीम समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास एकशे पाच जणांनी रक्तदान करून रेकॉर्ड केला आहे .

उमरी येथे प्रथमच मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक १२ जुन रविवारी मरकस मज्जित या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत १०५ जणांनी रक्तदान करून याठिकाणी चांगला संदेश दिला आहे. नांदेड येथील दि क्रिसेंट रक्तपेढी यांना रक्तदान देण्यात आले आहे.

या रक्तपेढीचे संचालक डॉ.मोहम्मद सिद्दीकी, डॉ कनकदडे, डॉ श्रीनिवास यरनालीकर, कपिल वाढवे, नामदेव पांचाळ, रवी देशमाने, शेख हुसेन, शेख माजिद, माने मामा आदींनी रक्त संकलन केले तर आज झालेल्या रक्तदान शिबिराला उमरी येथील स्त्री रोग तज्ञ डॉ माधव विभुते, बाल रोग तज्ज्ञ डॉ. मारुती चंदापुरे, राष्ट्रवादीचे पांडुरंग देशमुख गोरठेकर, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, जिल्हा बँकेचे संचालक कैलास गोठेकर, काँग्रेसचे बापूसाहेब कोडगावकर, माजी नगराध्यक्ष प्रवीण सारडा, सह पत्रकार, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या भव्य रक्तदान शिबिरास मुस्लिम समाजातील मौलवी, ज्येष्ठ नागरिक व युवकांनी मोठी मेहनत घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या