25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे ११ गुन्हे उघड

नांदेड जिल्ह्यात जबरी चोरीचे ११ गुन्हे उघड

एकमत ऑनलाईन

नांदेड : सध्या जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या दरम्यान जिल्ह्यात कुठेही जबरी चोरी, चैन स्नॅचिंग या सारखे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले होते, दरम्यान नांदेड पालिसांनी या संचारबंदी काळात ११ जबरी चोरीचे गुन्हे उघड करून ५ लाख १५ हजार ५५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नांदेड जिल्ह्यात घडलेले गुन्हे उघकीस आणुन गुन्ह्यात चोरी गेलेला माल हस्तगत करणयाचे आदेश पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थागुशाला दिले होते. त्यानुसार स्थागुशाचे पोलिस निरीक्षक चिखलीकर व पोनि आशोक घोरबांड यांनी सर्व गुन्ह्याच्या शोधासाठी खब-याकडुन माहीती घेवुन आरोपी यश गौतम जोंधळे व आरोपी किरण सुभाष केळकर दोघेही रा. नांदेड यांना अटक करून त्यांच्या कडुन जबरी चोरीचे गुन्हे उघड करून आरोपीकडुन चार गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, कॅमेरा, मोबाईल असा एकुण ६१ हजार रूपयेपयाचा ऐवज जप्त केला. तसेच स्थागुशाचे पोलिस निरीक्षक चिखलीकर, सपोनि भारती, पोउपनि सोनवने, पोउपनि बाराटे यांनी आरोपी श्रीनिवास गणेशराव सावंत रा. सरेगाव ता. मुदखेड, बालाजी संभाजी महाशेट्टे , प्रकाश नारायण खवास दोघेही रा. धनज ता.मुदखेड यांना ताब्यात घेऊन व अटक करून पो.स्टे. कंधार, बिलोली व मुखेड या तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करून त्या गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचे दागीने, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण २ लाख ४६ हजार ५० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

देगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचेश ४ गुन्हे घडले होते. पोलिस निरीक्षक भगवान धबडगे व त्यांच्या पथकातील महिला पोलिस उपनिरीक्षक सांगळे, पो.ना. येमलवाड, कंधारे, आलेवाड, पांचाळ व तलवारे या कर्मचा-यांनी आरोपी रंजित माधव गायकवाड वय ३0 रा. देवापूर ता. देगलूर ह.मु. जिगळा ता. बिलोली व आरोपी सुभाष विठ्ठल श्रीमंगले वय ५५ रा. मांगी ता. निजामसागर जि. कामारेड्डी या दोघांना पकडून अटक केली. जबरी चोरीच्या चार गुन्ह्यात चोरीस गेलेले दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा २ लाख ५ हजार रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. पोििलस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. द्वारकादास चिखलीकर व त्यांचे पथक पो.नि. अशोक घोरबांड, पो.नि. भगवान धबडगे यांच्या पथकातील पोलिस कर्मचा-यांनी नांदेड जिल्ह्यातील एकूण ११ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

या गुन्ह्यातील अंदाजे ५ लाख १५ हजार ५५0 रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या ११ गुन्ह्यातील ७ आरोपी निष्पन्न करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलिस अधिका-यांच्या पथकातील सहा.पो.नि. पी.डी. भारती, पो.उपनि. सचिन सोनवणे, पो.उपनि अशिष बोराडे, पोलिस जमादार गुंडेराव कारले, अजम पठाण, पोििलस शिपाई देवा चव्हाण, रवि बाबर, संजय जिंकलवाड, बालाजी यादगिलवाड, हेमंत बिचकेवाड, बजरंग बोडके, दादाराव श्रीरामे, बालाजी मुंडे, राजू पुल्लेवाड आदींनी कारवाई यशस्वी केली.

लातुरातील नेत्र व दंत चिकित्सालये ३० एप्रिल पर्यंत बंद, मनपा आयुक्तांचे आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या