22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeनांदेडधर्माबाद नगरपालिकेच्या ११ सफाई कामगारांची फरफट

धर्माबाद नगरपालिकेच्या ११ सफाई कामगारांची फरफट

एकमत ऑनलाईन

धमार्बाद : येथील नगरपालिकेच्या अकरा वारस सफाई कामगारांना कायमस्वरूपी आदेश देण्यासंबंधी नगरपालिका शासन व प्रशासनाकडून अजूनही फरफट सुरूच आहे.उच्च न्यायालयाने या संदर्भात दिेलेल्या निर्णयाचा अवमान केला जात आहे. यामुळे कामगारांमधून संताप व्यक्त होत आहे. धमार्बाद नगरपालिकेमध्ये कार्यरत असणा-या अकरा वारस सफाई कामगारांना दिनांक ८ सप्टेंबर २०१४ च्या प्रस्तावानुसार कायमस्वरूपी कामावर घेणे यासंदर्भात मंजुरी मिळाली होती. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्यासह जून २०१९ च्या आदेशान्वये नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, आयुक्त तथा संचालक न. प. प्र. संचालनालय व जिल्हाधिकारी नांदेड या सर्व प्रक्रियेमधून निकष पूर्ण पात्र ठरून उपरोक्त अकरा वारस सफाई कामगार हे आपल्या कायमस्वरूपी नोकरीस पात्र झाले आहेत.

परंतू त्यांना मुख्याधिकारी नगरपालिका यांच्याकडून केवळ नियुक्तीचे आदेश पत्र देणेच बाकी असतानानाही अद्यापही ते मिळत नाही.गेल्या अनेक महिन्यापासून पाठपुरावा करूनही कामगारांची फरफट सुरूच आहे. नगरपालिकेमध्ये जवळपास सर्वच नगरसेवकांनी या नियुक्तीच्या संदर्भात पाठिंबा दर्शविला असतानाही वारस सफाई कामगारांना लेखी आदेश का मिळत नाही हा प्रश्नाचे गुढ कायम आहे. श्रमिक संघाच्या वतीने कॉ. मुकुंद कदम यांनी हा लढा यशस्वी लढला आहे. १ मे म्हणजेच कामगार दिनी कामगारांना नोकरीत कायमस्वरूपीचे आदेश लेखी स्वरूपात मिळतील अशी आशा होती. पण प्रभारी मुख्याधिकारी तथा धमार्बादचे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी नगरपालिका पदाधिका-यांनी चार दिवस थांबा म्हणून सांगितले असे सांगतले होते.हे चार दिवस उलटूनही त्यांना आदेश मिळत नाहीत.

सर्व कामगारांनी नगरपालिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना सोडून सर्व नगरसेवकांच्या भेटी घेतल्या असून या सर्वांनीच सदरील कामगारांना कायमस्वरूपी आदेश देण्यासंदर्भात समर्थनच दर्शवले आहे.तरीही नियुक्ती पत्र न देण्यात आले नाही यामुळे उच्च न्यायालयाचा अवमान नगरपालिका प्रशासन करित आहे.या लढ्याच्या पार्श्वभूमीवर कुठलीही लेखी निवेदन न देता कुठल्याही क्षणी नगराध्यक्ष उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या घरावर मोर्चे नेऊन ठिय्या मांडून बसू. तसेच नगरपालिका प्रशासना समोरही आंदोलने तीव्र करू असा इशारा सर्व श्रमिक संघाच्या वतीने मुकुंद कदम यांनी दिला आहे.

विधिमंडळाच्या निर्णयावर न्यायालयाचा वरवंटा….!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या