नांदेड : कोरोना विषाणूचे रूग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून नांदेड शहरातील ११ कोव्हिड रूग्णालयात बेड हाऊसफुल झाले असून एकुण ४०४ बेडपैकी जनरलमध्ये केवळ १ बेड १४ सप्टेंबर रोजी उपलब्ध होता. आयसीयू मधील २०६ बेड हाऊसफुल असल्याचे जिल्हा रूग्णालयाच्या वतीने दिलेल्या अहवालात नमुद केले आहे.
शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचे बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शासनाच्यावतीने कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र फैलाव मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. शहरातील आजघडीला ११ कोव्हीड सेंटर उपलब्ध आहेत, त्यात जवळपास ४०४ जनरल बेड कोरोना बाधित रूग्णांसाठी असुन अतिदक्षता विभागातील २०६ बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी आजघडीला सर्वच बेड हाऊसफुल असल्याचे जिल्हा रूग्णालयाच्यावतीने देण्यात आलेल्या अहवालात नमुद केले आहे.
शहरातील खाजगी हॉस्पीटल आशा हॉस्पिटल ४१ बेड, अश्विनी हॉस्पिटल १८ , भगवती हॉस्पिटल १५ , देवगिरी हॉस्पिटल २९, शासकीय रूग्णालय विष्णुपूरी १२६, गोदावरी केअर सेंटर १६, नांदेड किर्टीकल केअर २१, निर्मल कोव्हिड सेंटर २०, समर्पन कोव्हिड सेंटर १२, एसजीजीएस हॉस्पिटल ८० श्री हॉस्पिटल २६ बेड अशा प्रकारे कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
मात्र सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जवळपास सर्वच बेड हाउसफुल असल्याचे दिलेल्या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना कोरोनावर उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जागा उपलब्ध सध्यातरी नाही. नागरिकांनी या सर्व बाबींचा विचार करून आपले कुटूंब व आपण कोरोनापासुन मुक्त राहण्यासाठी आपल्या परिने उपाययोजना करावी, असे अवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
गोकुळ शुगर्सच्या बिलासाठी चिमणीवर चढून आंदोलन