23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडमास्कविक्रीतून महिलांनी केली १२ लाखांची उलाढाल

मास्कविक्रीतून महिलांनी केली १२ लाखांची उलाढाल

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना महामारीमुळे गेल्या पाच महिन्यापासून देश संकटात आहे़ अनेक कुटूंब अर्थीक अडचणीत आहेत़ या संकटात जीवनज्योत अभियानांतर्गत स्थापन झालेल्या जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या माध्यमातुन मास्क विक्री करून जवळपास १२ लाख रूपयांची उलाढाल झाली आहे़ त्यामुळे त्यांच्या कुटूंबांना मोठा आधार मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित झालेल्या नांदेड जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहामार्फत मास्क, फळ,भाजी,धान्य विक्री करून (लॉकडाऊन काळात) कोविड-१९ काळात रोजगार मिळवला.तसेच स्वत:च्या कुटुंबाला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने वाटचाल केली व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न केले आहेत.

जगावर तसेच भारत देशावर हे आलेले संकट लक्षात घेता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित झालेल्या महिला स्वयंसहायता समूह मार्फत कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी महिलांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,मुंबई श्रीमती.आर.विमला , मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,नांदेड,श्री.शरद कुलकर्णी, मा. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,नांदेड श्री.व्ही.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाने महिला समूहांनी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

त्यामध्ये शिवणकाम करणा-या समुहातील महिलांनी मास्क बनून ते गाव,तालुका, व जिल्हा स्तरावर विक्री केले तसेच जिल्हा व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक यांनी समूहांना जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत तसेच नगरपालिका महानगरपालिका येथून आॅर्डर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व वेळोवेळी मार्गदर्शन केले. या सर्व प्रयत्नांना यश म्हणून जिल्ह्यातील एकूण ७८ समूहानं मार्फत मास्क निर्मिती करण्यात आली सरासरी प्रत्येक मस्कची विक्री ही १५ रुपये किमतीने करण्यात आली.समूहातील महिलांनी एकूण८२२१५ मास्क विक्री केले. त्यामधून महिलांना १२३३२२५/- रु. उलाढाल झाली आहे.

जिल्ह्यातील रहिवासी लोकांना तसेच आरोग्य कर्मचाº्यांना,पोलीसकर्मचारी यांना मास्क मिळाले तसेच या कामातून महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. या कामाकरिता जिल्हा व्यवस्थापक टीम गणेश कवडेवार,धनंजय भिसे,द्वारकादास राठोड,धनंजय देशपांडे ,माधव भिसे,रमेश थोरात व तालुका टीमने महिनत घेतली.

Read More  लॉकडाऊ न शिथिल; बाजारात नागरिकांची तोबा गर्दी

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या