34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeनांदेडजिल्ह्यात १२५५ नविन कोरोना बाधित; २६ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १२५५ नविन कोरोना बाधित; २६ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ४ हजार ५३४ अहवालापैकी १ हजार २५५ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ५०६ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७४९ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ५० हजार ८९२ एवढी झाली असून यातील ३८ हजार ८९१ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १० हजार ७८३ रुग्ण उपचार घेत असून १८९ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

आज रोजी १ हजार १४२ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी १५, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण ७७२, कंधार तालुक्याअंतर्गत २, किनवट कोविड रुग्णालय १७, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत ९, भोकर तालुक्याअंतर्गत ४९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १८, उमरी तालुक्यातंर्गत २१, नायगाव तालुक्याअंतर्गत २९ , मुखेड कोविड रुग्णालय ७, देगलूर तालुक्याअंतर्गत ७ , अर्धापूर तालुक्याअंतर्गत १२, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १२, हदगाव कोविड रुग्णालय ६, माहूर तालुक्याअंतर्गत ११, धमार्बाद तालुक्याअंतर्गत ११, लोहा तालुक्याअंतर्गत २८, खाजगी रुग्णालय ११६ असे एकूण १ हजार १४२ बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.४१ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २३८, देगलूर १९, कंधार ३६, मुदखेड २, हिंगोली ३, नांदेड ग्रामीण १३, धर्माबाद १८, किनवट ९, मुखेड ३२, यवतमाळ १, अर्धापूर ९, हदगाव ६०, लोहा १, नायगाव ३०, भोकर २०, हिमायतनगर १३, माहूर १, परभणी १ असे एकूण ५०६ बाधित आढळले.आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २८६, बिलोली २१, हिमायतनगर १८, मुदखेड ६, कंधार ४८, नांदेड ग्रामीण ३०, देगलूर ३९, किनवट १०१, मुखेड ५२, नायगाव २०, अर्धापूर ३० , धमार्बाद १३, लोहा १९, उमरी २६, हिंगोली १, भोकर २३, हदगाव २६, माहूर ४, परभणी ३, यवतमाळ १ असे एकूण ७४९ व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

जिल्ह्यात १० हजार ७८३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २३४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १०८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) १९५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १२५, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १३२, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १८६, देगलूर कोविड रुग्णालय ५२, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर १०६, बिलोली कोविड केअर सेंटर २५९, हिमायतनगर कोविड केअर सेंटर १७, नायगाव कोविड केअर सेंटर ९६, उमरी कोविड केअर सेंटर ३२, माहूर कोविड केअर सेंटर २०, भोकर कोविड केअर सेंटर २४, हदगाव कोविड रुग्णालय ४५, हदगाव कोविड केअर सेंटर ५२, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ११६, कंधार कोविड केअर सेंटर २०, धमार्बाद कोविड केअर सेंटर ७२, मुदखेड कोविड केअर सेंटर ११, अर्धापूर कोविड केअर सेंटर २६, बारड कोविड केअर सेंटर ४०, मांडवी कोविड केअर सेंटर ८, महसूल कोविड केअर सेंटर ११९, एनआरआय कोविड केअर सेंटर २००, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १५२, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ४ हजार ६६०, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण २ हजार १३६, खाजगी रुग्णालय १ हजार ५४० असे एकूण १० हजार ७८३ रुग्ण उपचार घेत आहेत.

आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ६ खाटा उपलब्ध आहेत.

हा तर ‘ध’ चा ‘मा’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या