29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडनांदेडात आज १ हजार २९३ जणांना रुग्णालयातून सुट्टी

नांदेडात आज १ हजार २९३ जणांना रुग्णालयातून सुट्टी

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ३ हजार ९८१ अहवालापैकी १ हजार ९९ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७८८ तर अँटिजेन तपासणीद्वारे ३११ अहवाल बाधित आहेत.तर तीन दिवसात २७ जणांचा मृत्यु झाला आहे.परंतू दिलासादायक म्हणजेच १ हजार २९३ जणांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.ही बाधितापेक्षा अधिक आहे.

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ७२ हजार ८९० एवढी झाली असून यातील ५७ हजार २७३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १४ हजार ८ रुग्ण उपचार घेत असून २४० बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक २० ते २२ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३४९ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.५७ टक्के आहे. अतिगंभीर प्रकृती असलेले रूग्ण-२४०. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ३२८, बिलोली ६६, कंधार ६७, मुखेड ६, माहूर ४, हिंगोली १, नांदेड ग्रामीण २४, देगलूर ५०, किनवट ६१, नायगाव ३३, यवतमाळ ३, अर्धापुर १, धर्माबाद २, लोहा १८, उमरी ४१, लातूर ३, भोकर ४१, हिमायतनगर २६, मुदखेड ९, हदगाव २, परभणी २ असे एकूण ७८८ बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात ३०, बिलोली ५, हिमायतनगर १८, माहूर २२, उमरी १९, नांदेड ग्रामीण १२, देगलूर ९, कंधार ३, मुदखेड २२, हिंगोली १, अर्धापुर ५, धर्माबाद ४, किनवट ४४, मुखेड ४४, भोकर १६, हदगाव ७, लोहा १३, नायगाव ३७ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ३११ बाधित आढळले.

आज १ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १८, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ७१९, भोकर तालुक्यातंर्गत १, देगलूर कोविड रुग्णालय १३, अर्धापुर तालुक्यातंर्गत २०, उमरी तालुक्यातंर्गत २४, खाजगी रुग्णालय १०७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ४८, मुखेड कोविड रुग्णालय १३०, कंधार तालुक्यातंर्गत २४, किनवट कोविड रुग्णालय ६४, हिमायतनगर तालुक्यातंर्गत २९, बारड कोविड रुग्णालय ४, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय २९, हदगाव कोविड रुग्णालय ११, माहूर तालुक्यातंर्गत १७, नायगाव तालुक्यातंर्गत २, लोहा तालुक्यातंर्गत ३२, मांडवी कोविड केअर सेंटर १ यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १४ हजार ८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २४५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १११, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २०९, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १३७, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १४२, नायगाव कोविड केअर सेंटर ५२,उमरी कोविड केअर सेंटर ७०, माहूर कोविड केअर सेंटर ५७, भोकर कोविड केअर सेंटर १३, हदगाव रुग्णालय ५१, बारड कोविड केअर सेंटर १५, भक्ती कोविड केअर सेंटर ५६, एनआरआय कोविड केअर सेंटर ८५, पंजाब भवन कोविड केअर सेंटर २१०, मनपा अंतर्गत गृह विलगीकरण ५ हजार ९२३ , मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १७९, देगलूर कोविड रुग्णालय ५४, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर ६१, बिलोली कोविड केअर सेंटर ९४, हिमायतनगर कोविड केअर सेंटर ९, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १०५, कंधार कोविड केअर सेंटर २९, धमार्बाद कोविड केअर सेंटर १३३, मुदखेड कोविड केअर सेंटर ३१२, अर्धापुर कोविड केअर सेंटर ९, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण ३ हजार ४५१ खाजगी रुग्णालय २ हजार १८४ , हैद्राबाद येथे संदर्भित १ असे एकूण १४ हजार ८ रुग्ण उपचार घेत आहेत.

आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे ३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे ८ खाटा उपलब्ध आहेत.

दोन ऑक्सीजन टँकर विना अडथळा नांदेडात दाखल
कोरोनाच्या काळात ऑक्सीजनचे महत्व काय असते याचा अनुभव सर्वांच येत आहे. हा जीवनदायी ऑक्सीजन कर्नाटकातून घेऊन आलेले दोन टँकर महामार्ग पोलिसांनी पायलटिंग करित नांदेडात विना अडथळा पोहचती केले.या सुखद बातमीने नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संकट काळात ऑक्सिजन टँकचे मोल किती आहे, हे सध्या दिल्लीवासिय आणि नाशिककर अनुभवत आहेत.

कमी अधिक प्रमाणात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे.नांदेडसाठी ऑक्सीजन घेऊन येणारे दोन टँकर बेल्लारू कर्नाटक येथुन निघाले होते. नांदेड हद्दीत गंगाखेड लोहा ते नांदेड कडे येणारे ऑक्सिजन टँकर एपी ३१ टीक्यु १३४५ पायलटिंग करीत सुरक्षित विना अडथळा श्री गुरू गोविंद सिंग रग्णालय,नांदेड येथे पोहविले आहे. एपी ३१ टीक्यु १३३६ हे टँकर सत्य कमल एमआयडीसी नांदेड येथे पोहचले.ही नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. या दोन्हीही मार्गावर विनाअडथळा टँकर पास व्हावे म्हणून दोन अधिकारी व कर्मचारी यांनी पायलेटिंग करून ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहचविले. याकामी महामार्गचे पोलीस निरीक्षक अरुण केंद्रे , पोउपनि विठ्ठल दूरपडे , पोउपनि ज्ञानेश्वर बसवंते व कर्मचा-यांनी सहभाग नोंदवला.नाशिक घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी स्वत: शासकीय रूग्णालयातील ऑक्सीजन प्लँटचे ऑडीट केले होते.

नियमांचे उल्लंघन; सगरोळीच्या आठवडी बाजारात उडाला फज्जा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या