32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeनांदेडवाळू वाहतूक करणारे १३ ट्रॅक्टर महसूल विभागाच्या ताब्यात

वाळू वाहतूक करणारे १३ ट्रॅक्टर महसूल विभागाच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी : येथून जवळच असलेल्या हुनगुंदा हद्दीतील मांजरा नदी पात्रात खाजगी वाळू धक्याला शासनाने परवानगी दिली होती . त्या धक्यावरून वाळू वाहतूक करनारे १३ ट्रॅक्टर आज महसूल विभागाच्या पथकाने अधिक चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतल्याचे बिलोलीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगीतले .

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रधुर्भव असल्याने रेती घाटा चे लिलाव झाले नव्हते त्यामुळे बांधकामे खोळंबली होती , सरकारी बांधकामे , घरकुल असे अनेक कामाचा समावेश होता . बिलोली महसूल विभागाच्या अतंर्गत हुनगुंदा येथे एका खाजगी रेती घाटा ला शासनाने परवानगी दिली होती त्यामुळे गेल्या चार पाच दिवसापासून कुंडलवाडी व परिसरात गरजूना रेती टाकण्यासाठी ट्रॅक्टर ने रेती वाहतूक चालू होते आज बिलोली महसूल विभागाने अचानक रेती वाहतूक करणा-्या वाहनाची ची तपासणी करण्यासाठी आपल्या कर्मचा-्यांचा फोजफाटा घेऊन धडक मारली यात चौकशी साठी १३ ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून यात सर्व ट्रॅक्टर चालकाकडे रॉयल्टी च्या पावत्या होत्या पण वाहन परवानगी , वे बिल ची तपासणी करणे आशा अधिक तपासणी व चौकशी साठी ताब्यात घेतले.

यात या वाहनाची अधिक चौकशी साठी तहसीलदार यांनी ताब्यात घेतल्या चे सांगत या चौकशी अंती काही नियमाचे उल्लंघन केलेले आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले . प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे व नायब तहसीलदार रघुनाथसिह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली , महसूल व पोलीस प्रशासन , मंडळ अधिकारी तोटावार , मुळेकर , पेशकार कोकाटे , तलाठी बिराजदार , मेहत्रे , चमकुरे , आरू , सोनूले , राजकुंडल , लिपीक हजारे , झपलंकर आदी जण या पथकात समावेश होता.

दिल्लीतील सर्व बाबुंना इलेक्ट्रिक कार अनिवार्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या