माहूर : माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गतची यापुर्वी किनवट न्यायालयाच्या कार्यकक्षेत असलेली सारखणीसह तेरा गावे आता माहूर न्यायालयाच्या कार्यकक्षेत आल्याचे पत्र प्राप्त झाले असून यापुढे खालील तेरा गावची न्यायालयीन प्रकरणे आता माहूर न्यायालयाच्या कार्यकक्षेत चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेली किनवट तालुक्यातील सारखणीसह डुंड्रा, दहेली बाजार, दहेली तांडा, धानोरा शीख, गौरी, गौरी तांडा, चिंचखेड, पाथरी, रामपूर, भामपूर, चिंचखेड तांडा व सलाईगुडा ही तेरा गावे यापुर्वी किनवट न्यायालयाच्या कार्यकक्षेत जोडलेली होती. परंतू महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे कायदेशीर सल्लागार तथा सह-सह सचिव एन. व्ही. जिवने यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या पत्रानुसार ही तेरा गावे आता माहूर न्यायालयाच्या कार्यकक्षेत आली आहेत. त्यामुळे वरील गावची न्यायालयीन प्रकरणे आता माहूर न्यायालयात चालणार आहेत.