25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात १ हजार ३५१ व्यक्ती कोरोना बाधित,२५ जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात १ हजार ३५१ व्यक्ती कोरोना बाधित,२५ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड: जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ४हजार ६७६ अहवालापैकी १ हजार ३५१ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६१३ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७३८ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ६५ हजार १५० एवढी झाली असून यातील ५० हजार ८० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १३ हजार ६०७ रुग्ण उपचार घेत असून 226 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक १४ ते १६ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार २०२ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.८६ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २७५, नांदेड ग्रामीण २३, अर्धापूर २, देगलूर १, धर्माबाद ८२, हदगाव २२, हिमायतनगर १, कंधार ६६, किनवट १, लोहा ४१, मुखेड ३९, मुदखेड ८, नायगाव ८, उमरी २५, परभणी १०, हिंगोली ३, लातूर १, यवतमाळ १, भोकर ४,असे एकूण ६१३ बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात १३७, नांदेड ग्रामीण ४७, अर्धापर २६, भोकर ४७, बिलोली ४८, देगलूर १०, धर्माबाद १९, हदगाव ३०, कंधार ३०, किनवट ९३, लोहा २४, माहूर १३, मुखेड ६२, नायगाव ३६, उमरी २२, परभणी ४, यवतमाळ १, मुदखेड ८५ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ७३८ बाधित आढळले. आज १ हजार २३४ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी २०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ७६९, कंधार तालुक्याअंतर्गत ७, किनवट कोविड रुग्णालय ३५, हिमायतनगर तालुक्यातंर्गत २६, माहूर तालुक्यातंर्गत ६, देगलूर कोविड रुग्णालय ९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २१, मुखेड कोविड रुग्णालय ७३, नायगाव तालुक्यातंर्गत ११, बारड कोविड केअर सेंटर ४, अधार्पूर तालुक्यातंर्गत १२, बिलोली तालुक्यातंर्ग २०, खाजगी रुग्णालय १०३, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ९, हदगाव कोविड रुग्णालय २६, धमार्बाद तालुक्यातंर्गत १३, उमरी तालुक्यातंर्गत २४, लोहा तालुक्यातंर्गत ४६ यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १३ हजार ६०७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २५०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ११२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २२५, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १५५, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२५, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २०३, देगलूर कोविड रुग्णालय ५८, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर ८८, बिलोली कोविड केअर सेंटर १५८, हिमायतनगर कोविड केअर सेंटर २३, नायगाव कोविड केअर सेंटर ६९, उमरी कोविड केअर सेंटर ९३, माहूर कोविड केअर सेंटर ७०, भोकर कोविड केअर सेंटर २५, हदगाव कोविड रुग्णालय ५१, हदगाव कोविड केअर सेंटर १०५, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १३७, कंधार कोविड केअर सेंटर २६, धमार्बाद कोविड केअर सेंटर १०४, मुदखेड कोविड केअर सेंटर १३, बारड कोविड केअर सेंटर २८, मांडवी कोविड केअर सेंटर ७, महसूल कोविड केअर सेंटर १५४, एनआरआय कोविड केअर सेंटर ११२, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १५१, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ५ हजार 630 आहेत.

उस्मानाबादेत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्वत्र गर्दी कायम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या