22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात १३८ व्यक्ती कोरोना बाधित, एकाचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात १३८ व्यक्ती कोरोना बाधित, एकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात १३८ व्यक्ती कोरोना बाधित आले आहेत.उपचार घेणा-या एकाचा मृत्यू तर १४६ कोरोना बाधित झाले बरे आहेत. जिल्हयातील ३ हजार ६११ अहवालापैकी १३८ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६५ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७३ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९० हजार ६९९ एवढी झाली असून यातील ८७ हजार ६३६ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या घडीला ६३९ रुग्ण उपचार घेत असून १४ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

आजच्या अहवालानुसार ८ जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे पौर्णिमानगर येथील ४५ वर्षार्चा पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या १ हजार ८९४ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा २७, कंधार १, नायगाव १, परभणी २, नांदेड ग्रामणीण १६, किनवट ३, माहूर १, यवतमाळ १, अधार्पूर १, लोहा ३, मुदखेड १, हिंगोली १, हदगाव २, मुखेड ४, उमरी १, तर अ‍ॅन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात ३६, हदगाव ३, मुखेड २, यवतमाळ २, नांदेड ग्रामीण १४, हिमायतनगर १, उमरी २, वाशिम २, वाशिम १, अधार्पूर १, कंधार १, परभणी २, देगलूर ३, लोहा ३, हिंगोली २, असे एकूण १३८ बाधित आढळले. आज जिल्ह्यातील १४६ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २, मुखेड कोविड रुग्णालय १, अधार्पूर तालुक्यातर्गंत १, भोकर तालुक्यातर्गंत २, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड २, देगलूर कोविड रुग्णालय २, माहूर तालुक्यातर्गत ४, हिमायतनगर तालुक्यातर्गत ५, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर १०७, किनवट कोविड रुग्णालय १, बिलोली तालुक्यातंर्गत १, खाजगी रुग्णालय १८ व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज ६३९ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी २६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ३७, लोहा कोविड रुग्णालय ३, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १, किनवट कोविड रुग्णालय १९, देगलूर कोविड रुग्णालय ६, हदगाव कोविड रुग्णालय ५, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण ३६७, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण १३५, खाजगी रुग्णालय ४0 व्यक्ती उपचार घेत आहेत. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १0९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १२0 खाटा उपलब्ध आहेत.

एनपीएतून सुटका कशी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या