25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडजिल्ह्यात १४५0 नवे कोरोना रुग्ण

जिल्ह्यात १४५0 नवे कोरोना रुग्ण

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ४ हजार ६७७ अहवालापैकी १ हजार ४५० अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६७६ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७७४ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ६६ हजार ६०० एवढी झाली असून यातील ५१ हजार ३८५ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १३ हजार ७२४ रुग्ण उपचार घेत असून २११ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक १५ ते १७ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत २८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार २३० एवढी झाली आहे.उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.१५ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २४८, नांदेड ग्रामीण १७, अधार्पूर २३, देगलूर ५२, हदगाव ३०, हिमायतनगर २२, कंधार ४, किनवट २४, लोहा ४१, मुखेड ३७, मुदखेड ६, नायगाव ८५, उमरी ५५, परभणी १, हिंगोली ३, यवतमाळ ४, भोकर २२, चंद्रपूर १, बिलोली १ असे एकूण ६७६ बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात १५७, नांदेड ग्रामीण ४६, अधार्पूर ३५, भोकर २१, बिलोली ३१, देगलूर ४७, धमार्बाद २, हदगाव ५७, कंधार ३९, किनवट ६९, लोहा ३१, माहूर १७, मुखेड ३३, नायगाव ५८, उमरी ४९, परभणी ३, यवतमाळ २, मुदखेड ६१, लातूर १, हिंगोली २, आदिलाबाद २ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ७७४ बाधित आढळले.

आज १ हजार ३०५ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी १०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ७४१, कंधार तालुक्याअंतर्गत ७, किनवट कोविड रुग्णालय २८, हिमायतनगर तालुक्यातंर्गत २०, माहूर तालुक्यातंर्गत ८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १८, मुखेड कोविड रुग्णालय १००, नायगाव तालुक्यातंर्गत १६, अधार्पूर तालुक्यातंर्गत २१, बिलोली तालुक्यातंर्गत ३३, खाजगी रुग्णालय १०८, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ९, हदगाव कोविड रुग्णालय २८, धमार्बाद तालुक्यातंर्गत ३१, उमरी तालुक्यातंर्गत २६, लोहा तालुक्यातंर्गत ५३, देगलूर कोविड रुग्णालय ५, मांडवी कोविड केअर सेटर १२, भोकर १ यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १३ हजार ७२४ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २२४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १२०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) २२६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १५३, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ११७, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर २१८, देगलूर कोविड रुग्णालय ५२, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 88, बिलोली कोविड केअर सेंटर १९८, हिमायतनगर कोविड केअर सेंटर १९, नायगाव कोविड केअर सेंटर ६७, उमरी कोविड केअर सेंटर ५५, माहूर कोविड केअर सेंटर ६३, भोकर कोविड केअर सेंटर ३१, हदगाव कोविड रुग्णालय २५, हदगाव कोविड केअर सेंटर १०६, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १३४, कंधार कोविड केअर सेंटर २१, धमार्बाद कोविड केअर सेंटर १३३, मुदखेड कोविड केअर सेंटर १५३, बारड कोविड केअर सेंटर ३२, मांडवी कोविड केअर सेंटर ६, एनआरआय कोविड केअर सेंटर ८७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १७५, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ५ हजार ५०८, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण ४ हजार ५८, खाजगी रुग्णालय १ हजार ६३०, अधार्पूर कोविड केअर सेटर २४, हैद्राबाद येथे संदर्भित १ असे एकूण १३ हजार ७२४ रुग्ण उपचार घेत आहेत. आज रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे १५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ८, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे १२ खाटा उपलब्ध आहेत.

लहान मुलांनी ऐकावं म्हणून…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या