नांदेड : बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा एका व्यापा-याची १५ लाख रूपयांची बॅग सराईत गुन्हेगारांनी लुटून नेली.ही थरारक घटना शहरातील हिंगोलीगेट उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.सदर घटनेत व्यापा-याने प्रतिकार करणाचा प्रयत्न केला मात्र पैशाची बॅग लुटून गुन्हेगार फरार झाले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,नवा मोंढा भागात हिंदुस्थान युनिलिव्हर्स कंपनीची योगेश मार्केर्टींग नावाची दुकान आहे. त्या दुकानाचे मालक ओम सखाहरी बोरलेपवार हे आहेत. तर गुरुद्वारा चौरस्ता जवळ युनियन बँक येथे त्यांचे खाते आहे.नेहमी प्रमाणे सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास ओम बोरलेपवार हे आपल्या दुकानातील जवळपास १४ लाख ८० हजाराची रुपये रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी आपल्या दुचाकीवर पैशांची बॅग ठेवून अण्णाभाऊ साठे चौकाकडून चिखलवाडीकडे निघाले होते.
त्यावेळी हिंगोलीगेट उड्डाण पुलाच्या मध्यभागी दुचाकीवर आलेल्या तीन गुन्हेगारांनी बोरलेपवार त्यांना थांबवून बंदुक व चाकुचा धाक दाखवून ती बॅग बळजबरीने नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओम बोरलेपवार त्यांनी ती बॅग खुप वेळपर्यंत ओढून ठेवली. अखेर त्या बॅगचे बंद तुटले आणि बॅग गुन्हेगारांच्या हातात गेली. यानंतर दरोडेखोर बॅग घेवून पसार झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, वजिराबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, संजय केंद्रे, येळगे व इतर कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी नवा मोंढा येथील दुकानातील सीसीटिव्ही फुटेजचीही तपासणी करून दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तुर्त काही हाती लागले नाही. लुटीची घटना घडली जेव्हा या उड्डाणपुलावरून अनेक गाड्यांवर अनेक जण गेले.
मात्र ओम बोरलेपवारची मदत करण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. कोरोनाचे संकट सुरू असतांना शहरात भर दिवसा १५ लाख रूपये लुटून दरोडेखोरांनी पोलिसांना उघडरित्या आव्हानच दिले आहे.तर लुटीच्या या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात दहशतीचे वातवावरण पसरले आहे.दरम्यान या घटनेतील आरोपी हे सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी वजीराबाद पोलिस व एलसीबीच्या तिन पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत पेट्रोलपंप चालकाची आठ लाखाची बॅग लंपास
पेट्रोलपंप चालकाच्या डोळयात तिखट टाकत चाकु हल्ला करून आठ लाख रूपये लुटल्याची घटना वडेपुरी रस्त्यावर आज सोमवारी दुपारी घडली.या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नांदेड लोहा रस्त्यावर असलेल्या वडेपूरी येथील शहीद पेट्रोलपंपचे व्यवस्थापक नागनाथ शंकरराव केंद्रे हे आपल्या पेट्रोलपंपाहून आठ लाख रुपये घेऊन नांदेडकडे येत होते. सोमवारी दुपारी बारा वाजता त्यांची दुचाकी वडेपुरीपासून काही अंतरावर पुढे येताच त्यांच्या डोळ्यात पाठीमागून येणा-या चोरट्यांनी तीखट टाकले.
यानंतर त्यांच्यावर चाकुहल्ला करुन त्यांच्याजवळ असलेली आठ लाख रुपयाची बॅग लंपास केली. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी घटनास्थळाची पाहणी करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
लसीकरण कार्यक्रमात न्यायालयीन हस्तक्षेप नको