24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeनांदेडनांदेड परिमंडळात १५० कोटी थकले

नांदेड परिमंडळात १५० कोटी थकले

एकमत ऑनलाईन

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडळाची थकबाकी वसूली मोहीम सध्या जोरदारपणे सुरू आहे. वीजग्राहकांकडून या मोहीमेस सकारात्मक प्रतिसाद मीळत असला तरी गेल्या आठ महिन्यांपासून ८२ हजार ४३६ वीजग्राहकांनी वीजबिलाचा एक पैसाही भरलेला नाही. तब्बल १५० कोटी ५६ लाख रूपयांची थकबाकी या वीजग्राहकांकडे थकली आहे.यामुळे महावितनणने आता कारवाईसाठी कंबर कसली आहे.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघूदाब वर्गवारीतील ८२ हजार ४३६ वीजग्राहकांनी नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या आठ महिन्यांच्या कालावधीत एकाही पैशाचे वीजबील भरलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महावितरणने गेल्या दीड वर्षात एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा बंद न करता अखंडीतपणे वीजपुरवठा केलेला आहे. मात्र नियमीत वीजबील भरणा-या वीजग्राहकांचा अपवाद वगळता वीजबील भरण्याकडे अद्यापही अनेक ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याशिवाय महावितरणकडे आता पर्याय उरलेला नाही.

नांदेड जिल्हयातील २३ हजार २०४ वीजग्राहकांनी १५ कोटी ५८ लाख थकवत गेल्या आठ महिन्यापासून एकही बील भरलेले नाही. यामध्ये भोकर विभागाच्या ५ हजार ५८८ वीजग्राहकांनी ३ कोटी ७३ लाख, देगलूर विभागातील ७ हजार ७१८ वीजग्राहकांनी 5 कोटी १० लाख, नांदेड ग्रामीण विभागातील ५ हजार ११० वीजग्राहकांनी २ कोटी ९० लाख तर नांदेड शहर विभागातील ४ हजार ७८८ वीजग्राहकांनी ३ कोटी ८५ लाख रुपये थकवले आहेत. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील १५ हजार ६०८ वीजगाहकांनी ११ कोटी ३२ लाख रुपये थकवले आहेत तर परभणी जिल्ह्यातील ४३ हजार ६२४ वीजगाहकांनी १२३ कोटी ६६ लाख रुपये थकवले आहेत.

आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने आता सर्व वर्गवारीतील ग्राहकांचे चालू देयक व थकबाकी वसुलीसाठी सर्व कार्यालयातली कर्मचारी व अधिकारी यांची विविध पथके तयार करून शर्थीर्चे प्रयत्न सुरू केले आहेत. एवढेच नव्हे तर महावितरणने आता थकबाकीदारा विरूद्ध कारवाईसाठी कंबर कसली आहे.वीजग्राहकांनी महावितरणची आर्थिक स्थिती लक्षात घेवून आपल्या वीजबिलांचा भरणा त्वरीत करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

‘अफवादात्मक’ लसीकरण!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या