33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeनांदेडनांदेड विभागातून १५० वी किसान रेल्वे रवाना; आजपर्यंत ४७,९५७ टन कांदा, टरबूज...

नांदेड विभागातून १५० वी किसान रेल्वे रवाना; आजपर्यंत ४७,९५७ टन कांदा, टरबूज व द्राक्षांची वाहतूक

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड रेल्वे विभागातील नगरसूल येथून १५० वी किसान रेल्वे २४६ टन कांदा घेवून पश्चिम बंगाल येथील मालडा टाऊन येथे रवाना झाली. वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात येत असून इतर स्थानकाहून शेतकरी, व्यापारी यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वेच्या वतिने करण्यात आले आहे.नांदेड रेल्वे विभागातून या वर्षी दि.५ जानेवारी, २०२१ रोजी सुरु केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला आहे. फक्त १२६ दिवसात १५० किसान रेल्वेने नगरसूल येथून देशाच्या विविध भागात कांदा, द्राक्षे आणि टरबूज पोहोचविले आहे. किसान रेल्वे ने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात येत आहे.

अनेक शेतकरी, व्यापारी याचा लाभ घेत आहेत. या १५० किसान रेल्वे मधून आजपर्यंत ४७,९५७ टन कांदा, टरबूज आणि द्राक्षांची वाहतूक झाली आहे. हा शेतीमाल देशातील विविध भागात जसे नवी दिल्ली, गुवाहाटी, मालडा टाऊन, अगरतला, फातुहा, न्यू जलपैगुडी इत्यादी ठिकाणी पोहोचविण्यात आला आहे. यामुळे कांदा, टरबूज आणि द्राक्षे उत्पन्न करणारे शेतकरी किसान रेल्वेचा लाभ घेत येत आहेत. नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणाहून सुद्धा किसान रेल्वे सुरु करण्याकरिता संबधित बी.डी.यु. टीम मधील अधिकारी प्रयत्न आहेत. इतर ठिकाणातील शेतकरी,व्यापा-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे.

कृषी क्षेत्राच्या माकेर्टींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. किसान रेल्वे चे वैशिठ्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावत आहेत.यामुळे शेती माल वेळेवर पोहोचत असून शेतक-्यांना चांगली बाजार पेठ उपलब्ध होते. शेतक-यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटलच्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्यात आली आहे.

नांदेड रेल्वे विभागातून मालवाहतूक वाढावी म्हणून उपिंदर सिंघ यांनी बिजनेस डेवलोपमेन्ट युनिटची टीम गठीत केली आहे. यामध्ये जी. चंद्रशेखर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, ए. श्रीधर वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक, उदयनाथ कोटला वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, शेख मोहम्मद अनिस वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता, नांदेड यांचा समावेश आहे. तसेच मालवाहतूकदार आणि व्यावसायिकांशी सतत संपर्कात राहण्या करिता डॉ. अनिरुद्ध पमार/विभागीय परिचाल व्यवस्थापक आणि व्ही. रविकांत सहायक वाणिज्य व्यवस्थापक यांची नियुक्ती केली आहे.

के.पी. शर्मा ओली यांचे पंतप्रधानपद गेले

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या