30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home नांदेड तामसा येथे १६ क्विंटल गोमांस जप्त

तामसा येथे १६ क्विंटल गोमांस जप्त

एकमत ऑनलाईन

हदगाव : तामसा येथील वार्ड क्रमांक एकमधील अवैधरित्या चालू असलेल्या कत्तलखान्यात पोलिसांनी शनिवारी सकाळी धाड टाकून साडेतेरा क्विंटल गोमान्स जप्त केले असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. चिडलेल्या जमावाकडून काहीजणांना मारहाण करून घटनास्थळावरून गुरे गायब करण्यात आली आहेत. येथील कथित कत्तलखान्यात अवैधरित्या विनापरवानगी गोवंशाची हत्या करून गोमांस विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी शनिवारी पहाटेच सापळा रचून संबंधित ठिकाणावर धाड टाकली.

घटनास्थळावरून दोन लक्ष ६२ हजार रुपये किमतीचे गोमान्स जप्त करून तिघांना ताब्यात घेण्यात आले. अचानक झालेल्या धाड कारवाईमुळे परिसरात खळबळ उडून जमाव जमला. पोलिसांनी आरोपी शफि तकसिर खाटीक, निसार याकूब खाटीक, मोमीन मुसा खाटीक सर्व रा. तामसा यांना अवैधरित्या व विनापरवानगी गोवंशाची कत्तल करून गोमांस विकण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेऊन कार्यवाही केली. यावेळी पोलिसांसमोरच जमलेल्या जमावाकडून काहीजणांना मारहाण होण्यामुळे वातावरणात तणाव बघायला मिळाला. पोलिसांना देखील जमाव आक्रमक होण्याचा अंदाज नव्हता.

कारवाईनंतर उद्भवना-या तनावाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळ परिसर व शहरातील अन्य ठिकाणी दिवसभर खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. गोमांस जप्त करण्याच्या घटनेनंतर एक ते दीड तासांनी जमाव होण्यास कारणीभूत असणा-यांचा शोध घेऊन चिथावणीखोराविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवत शांतता राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास तामसा येथील पोलिस करीत आहेत.

 

पक्षीजीवन का आले धोक्यात?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या