26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home नांदेड १७० बाधितांची भर; २२२ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

१७० बाधितांची भर; २२२ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात २२२ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर १७०व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ५८ तर अ‍ॅन्टीजेन किट्स तपासणीद्वारे ११२बाधित आले.आजच्या एकुण१ हजार ३५२ अहवालापैकी १ हजार१७० अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १७ हजार १७०एवढी झाली असून यातील एकूण १३ हजार९०९ बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण २ हजार १७०बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ६३ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील ७, बिलोली कोविड केंअर सेंटर ७, भोकर कोविड केंअर सेंटर १ हदगाव कोविड केंअर सेंटर२ कंधार कोविड केंअर सेंटर १, मुखेड कोविड केंअर सेंटर 6, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 30, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन ११२धमार्बाद कोविड केंअर सेंटर ७नायगाव कोविड केंअर सेंटर १५, अधार्पूर कोविड केंअर सेंटर७, खाजगी रुग्णालय २७ असे २२२ााधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ८३६९ टक्के आहे.

आज रोजी एकाही रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची संख्या एकूण ४४८ आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र ४६ हिमायतनगर तालुक्यात१ बिलोली तालुक्यात१कंधार तालुक्यात १ नांदेड ग्रामीण ४, हदगाव तालुक्यात १, मुखेड तालुक्यात ३ हिंगोली १ असे एकुण ५८ बाधित आढळले.

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ५१लोहा तालुक्यात ३, माहूर तालुक्यात ८, भोकर तालुक्यात १, उमरी १अधार्पूर तालुक्यात ४ मुखेड तालुक्यात १५हंगोली १, नांदेड ग्रामीण ७, किनवट तालुक्यात १ धमार्बाद तालुक्यात १ कंधार तालुक्यात २बिलोली तालुक्यात २ परभणी ३ यवतमाळ १ असे एकूण ११२ बाधित आढळले.

जिल्ह्यात २ हजार ७१० बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 156, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित १ हजार ६६२ जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 62, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड नवी इमारत येथे 38, आयुवैदिक शासकीय महा.कोविड रुग्णालय सेंटर १२ नायगाव कोविड केअर सेंटर येथे ४७ बिलोली कोविड केअर सेंटर येथे३१ मुखेड कोविड केअर सेंटर येथे ७१ देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 18, लोहा कोविड केअर सेंटर येथे ३२, हदगाव कोविड केअर सेंटर 34, भोकर कोविड केअर सेंटर २४, बारड कोविड केअर सेंटर येथे४ मुदखेड कोविड केअर सेटर १५ माहूर कोविड केअर सेंटर १५, किनवट कोविड केअर सेंटर येथे २७ धमार्बाद कोविड केअर सेंटर ३६ उमरी कोविड केअर सेंटर७५ कंधार कोविड केअर सेंटर २०, अधार्पूर कोविड केअर सेंटर ५८ खाजगी रुग्णालयात दाखल २६१लातूर येथे संदर्भित ३, निजामाबाद येथे संदर्भित , आदिलाबाद येथे संदर्भित २ झाले आहेत.

आज रोजी ५-३० वाजताची सद्यस्थितीत खालील रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी ६८, आर्येुवेदिक शासकीय महाकोविड रुग्णालय सेंटर ३५जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड ५५ कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अ‍ॅप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

एमपीएससी परीक्षेला समाजाचा विरोध नको

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या