29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात १७९८ कोरोना बाधित

नांदेड जिल्ह्यात १७९८ कोरोना बाधित

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ५ हजार ९६७ अहवालापैकी १ हजार ७९८ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे १हजार ४१ तर अँटिजेन तपासणीद्वारे ७५७ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ५९ हजार ४०८ एवढी झाली असून यातील ४५ हजार १९१ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १२ हजार ८५९ रुग्ण उपचार घेत असून १८८ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

सोमवारी कोरोना बाधेतून मुक्त होणा-या रुग्णांची संख्या १२९४ आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २६ आहे. आज नवीन सापडलेल्या रुग्णांची संख्या १७९८ आहे. आजपर्यंत कोरोना बाधेने मरण पावणा-या रुग्णांची संख्या ११०३ झाली आहे. मनपा अंतर्गत विलगीकरण -८४०, आयुर्वेदिक महाविद्यालय -१६, जिल्हा रुग्णालय कोवीड हॉस्पिटल नांदेड -४७, अर्धापुर -२०, खाजगी रुग्णालय ११४, किनवट -२७, शासकीय रूग्णालय विष्णुपूरी-२०, मुखेड -३४, हदगाव-३४, नायगाव-१७, कंधार-०३,हिमायतनगर-०७, लोहा-५०, उमरी-२२, भोकर-२५, बारड-१८,अशा एकूण १२९४ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४५ हजार १९१ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ७६.०६ टक्के आहे.

आज प्राप्त झालेल्या ५९६७ अहवालांमधील ४०६३ अहवाल निगेटीव्ह आहेत, १७९८ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या ५९४०८ एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये १०४१ आणि अँटीजेन तपासणीमध्ये ७५७ असे एकूण १७९८ रुग्ण आहेत.आजच्या १७९८ रुग्णांमध्ये सर्वाधिक नांदेड मनपा क्षेत्रात ५९७ रुग्ण आहेत. आज ३९७ स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ६५ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ४१ आहेत. आजच्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्रात -३७२, लोहा -७५, नांदेड ग्रामीण -३१, नायगाव-१४७, कंधार-१२९, मुदखेड -०५, अर्धापुर-०९, किनवट-२४, मुखेड-४०, देगलूर-४५, हिंगोली-०३, हदगाव-१०३, हिमायतनगर-०१, बिलोली-०२, धर्माबाद-१५, उमरी-३२, माहूर-०६, यवतमाळ-०१, लातूर-०१, असे १०४१ रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या अ‍ॅन्टीजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्र -२२५, किनवट-१०१, नायगाव-२४, नांदेड ग्रामीण-१६, बिलोली-०१, देगलूर-३५, लोहा-३८, उमरी -२२, भोकर -३७, अधार्पूर -५७, हिमायनगर-०६, मुखेड-७६, मुदखेड -२०, परभणी-०२, कंधार-०७,हदगाव-४३, धर्माबाद-२२, हिंगोली-०२, माहूर-२१, नंदुरबार-०१,लातूर-०१, असे ७५७ रुग्ण आहेत.

आज कोरोनाचे १२८५९ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपूरी -२५९, जिल्हा रुग्णालय-११७, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत-२२२,नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -५१६३, देगलूर -५०, नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण -३३६२, किनवट-१३५, हदगाव-१७४, महसूल कोविड-९७, मुखेड-१७७, लोहा-१०५, कंधार-७१, आयुर्वेदिक महाविद्यालय-१७९, खाजगी रुग्णालय-१७७७, बिलोली-९१, नायगाव-७७, उमरी-८३, माहूर-४३, भोकर-१२, हिमायतनगर-३१, धमार्बाद-१२४, मुदखेड-१९, अर्धापुर-२५, बारड-२२, मांडवी-११, जैनम कोवीड सेंटर देगलूर-६६, एनआरआय कोवीड सेंटर-९२,पंजाब भवन कोवीड केअर सेंटर-२७५ असे उपचार सुरू आहेत. यात अती गंभीर स्वरुपात १८८ रुग्ण आहेत.

लातूरला मिळाले लसीचे आणखी पाच हजार डोस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या