29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात १ ८५९ कोरोना बाधित

नांदेड जिल्ह्यात १ ८५९ कोरोना बाधित

एकमत ऑनलाईन

नांदेड: जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ६ हजार ६१७९ अहवालापैकी १ हजार ८५९ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ८५७ तर अँटिजेन तपासणीद्वारे१हजार २ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ५७ हजार ६१० एवढी झाली असून यातील४५ हजार ८८९ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १२ हजार ३८२रुग्ण उपचार घेत असून २३० बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक ७ ते १० एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत२७रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ९९६एवढी झाली आहे. दिनांक ७एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल हडको नांदेड येथील ६८ वषार्चा पुरुष, व्यंकटेश नांदेड येथील ५० वषार्चा पुरुष, लक्ष्मी नगर नांदेड येथील ६०वषार्ची महिला, भोकर तालुक्यातील भोसी येथील ६०वषार्ची महिला, शिवनगर नांदेड येथील ६० वषार्चा पुरुष, नायगाव तालुक्यातील नर्सी येथील ६०वषार्चा पुरुष, निजाम कॉलनी येथील ६५वषार्चा पुरुष, बिलोली येथील ७० वषार्चा पुरुष, साईबाबा नगरी उमरी येथील येथील ७९ वषार्चा पुरुष, दिनांक 8 एप्रिल रोजी कृष्णा नगर नांदेड येथील ३८ वषार्चा पुरुष, सिडको नांदेड येथील ५४वषार्चा पुरुष, भावसार चौक नांदेड येथील ६७वषार्चा पुरुष, उमरी कोविड केअर सेंटरे येथे उमरी तालुक्यातील धानोरावाडी येथील ७५ वषार्चा पुरुष, गोदावरील कोविड रुग्णालय सन्मित्र कॉलनी नांदेड येथील७० वर्षाच्या पुरुष, दिनांक९ एप्रिल रोजी शासकीय आयुर्वदिक महाविद्यालय येथे राज कॉर्नर नांदेड येथील५० वषार्ची महिला, विवेक नगर नांदेड येथील५० वषार्ची महिला, हनुमानगड नांदेड येथील ६१वषार्ची महिला, मुखेड कोविड रुग्णालय मुखेड तालुक्यातील दापका येथील ६० वषार्ची महिला, यशोसाई कोविड रुग्णालय बालाजी नगर नांदेड येथील ६८ वषार्ची महिला, दिनांक १० एप्रिल रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी येथे उमरी तालुक्यातील सिंधी येथील ६० वषार्ची महिला, हडको नांदेड येथील६५ वषार्ची महिला, प्रकाश नगर नांदेड येथील ७३ वषार्चा पुरुष, लोहा येथील ६०वषार्चा पुरुष, कंधार तालुक्यातील मंगल सांगवी येथील ७८ वषार्चा पुरुष, सराफा नांदेड येथील ७२वषार्चा पुरुष, वानेगांव ता. नांदेड येथील ६० वषार्चा पुरुष उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.१९टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ४४८ बिलोली ४३ हिमायतनगर२६मुदखेड ४ हिंगोली ४, नांदेड ग्रामीण२९ देगलूर ३९ कंधार २, मुखेड 34, परभणी २, अधार्पूर ७, धमार्बाद २, किनवट ४ नायगाव ६४भोकर 23, हदगाव५२ लोहा ३७, उमरी ३७ असे एकूण ८५७बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ३५१ बिलोली २९, नांदेड ग्रामीण६६ देगलूर ९, अधार्पूर ४८, धमार्बाद 7, भोकर २७, हदगाव २१ हिमायतनगर ६ माहूर ३६उमरी 32, कंधार २६ मुदखेड ६३, हिंगोली 3, किनवट १०९ मुखेड ८२ परभणी २, लोहा ५३, नायगाव 33 असे एकूण १ हजार २व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

कोरोना तपासणी वरुन तीन मेडिकल चालकाविरुद्ध कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या