24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeनांदेडरात्रीच्या वेळी २०० ब्रास वाळू केली जप्त ; जिल्हाधिका-यांची टिमसह कारवाई

रात्रीच्या वेळी २०० ब्रास वाळू केली जप्त ; जिल्हाधिका-यांची टिमसह कारवाई

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात बिहारी कामगारांना सोबत घेवून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असल्याची जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री अचानकपणे सर्व महसूल अधिका-यांना सुचित करत पोलिसांच्या सहकार्याने गोदावरी नदीपात्रात होत असलेल्या वाळू तस्करीवर धाड टाकत जवळपास २०० ब्रास वाळू जप्त करून चार बिहारींना ताब्यात घेतले आहे. यापुढे जिल्ह्यात कोणी वाळू तस्करी करीत असेल तर याद राखा असा दम देत ते म्हणाले की, आ देखें जरा… किसमे कितना है दम !

सोमवारी रात्री ९ नंतर जिल्हाधिका-यांनी महसूल विभागातील अधिका-यांना अचानक पणे सुचित करून आपणास वाळू तस्करी करणा-यांवर धाडी टाकायच्या आहेत, तात्काळ तयार व्हा. असे म्हणताच उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण व नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी फौजफाटा तयार केला. तर दुसरीकडे जिल्हाधिका-यांनी अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे, निलेश मोरे यांना सुचना देवून आपणही आमच्या सोबत चला, असा आदेश फर्मावल्यानंतर त्यांनी देखील तात्काळ तयारी दर्शवत वांगी, त्रिकुट, ब्राम्हणवाडा, नागापूर, बगनी येथे कारवाई केली. त्या ठिकाणी २०० ब्रासहून अधिक वाळूसाठा जप्त केला. या कारवाईत ७० तराफे नष्ट करण्यात आले आहेत. जप्त केलेला वाळू साठा चोरीस जावू नये म्हणून नदीपात्रात बंदूकदारी पोलिस व महसूल पथकास मुक्काम करण्यास सांगीतले. आज देखील ही कारवाई सुरूच होती.

जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळू उपसा करण्यासाठी बिहार येथून मजूर आणण्यात आले आहेत. नांदेड, मुदखेड, लोहा, नायगाव, उमरी या भागातून गोदावरी पात्रातुन ही टोळी वाळूचा अवैध उपसा करीत आहेत. ही बाब जिल्हाधिका-यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कुठल्याही परिस्थीतीत वाळू तस्करी होवू देणार नसल्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत ही कारवाई सुरूच होती. या ठिकाणी कारवाई होत असल्याचे लक्षात आल्यानंतर इतर ठिकाणच्या अवैध वाळू उपसा करणा-या तस्करांनी बिहारींचे इतरत्र पलायन करण्यास सुरूवात केली. जवळपास १० ते १२ गाड्यांचा ताफा नदीपात्राच्या परिसरात काल रात्री फिरत होता. त्यामधून ही कारवाई करण्यात आली. तसेच काही बिहारी शेतात लपुन बसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले.

यामध्ये चार बिहारींवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी पहाटच्या सुमारास नागापूर मांडवी रस्त्यावर रेती तस्करी करणा-या दोन ट्रक्टरवर कारवाई करण्यात आली असून मंडळ अधिकारी मोईन शेख यांनी ही कारवाई केली असून जवळपासू अडीच लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. नांदेड येथील कारवाईत पोलिस निरिक्षक प्रशांत देशपांडे, सुनिल निकाळजे, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, तलाठी मंडळ अधिकारी यांचा देखील समावेश होता. जप्त केलेली वाळू संबंधीत उपविभागीय अधिका-यांकडून रितसर लिलाव करून देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिका-यांनी महापालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांना संबंधीत गुत्तेदारांना माहिती दिल्यास त्यांना ही वाळू देण्यात येईल. असे देखील सांगीतले. जिल्हाधिका-यांच्या या धाडसी कारवाईमुळे वाळू तस्करी करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

महसूल अधिकारी बदलीच्या तयारीत…. !
कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त अतिरिक्त कामकाज अंगावर पडत आहे. जिल्हाधिकारी स्वत: १४ तास काम करीत असल्यामुळे आम्हाला देखील जिव धोक्यात टाकुन काम करावे लागत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव बदली करून घेण्याची वेळी आमच्यावर आली आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिका-याने बोलून दाखविले आहे.

 

सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग, ठोकशाहीने कारभार !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या