21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडकिनवट येथे रेल्वेखाली २२ बक-या चिरडल्या

किनवट येथे रेल्वेखाली २२ बक-या चिरडल्या

एकमत ऑनलाईन

किनवट : किनवट रेल्वे स्टेशनपासून चार किलोमीटर अंतरावर आदिलाबाद ते नांदेड लोहमार्गावरील आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस खाली बक-याचा कळप चिरडला गेल्याची दुर्दैवी घटना दिनांक १८ जुलै रोजी दुपारी घडली. यात २२ बक-या मृत्युमुखी पडल्या आहेत.
किनवटपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या श् सिरमेटी गावातील पाचपुते नामक शेतक-यांच्या २७ बक-याचा कळप सोमवारी सकाळपासून सिरमेटी शिवारात चरत होता.

शिवारात चढणारा कळप चरत चरत रेल्वे पट्टीवर आला. या दरम्यान आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्स्प्रेस किनवटकडे येत होती. रेल्वे गाडी सिरमिटी गावाजवळ येतात चालकाला पट्टीवर बक-याचा कळप असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखत इंजिनचे इमर्जन्सी ब्रेक लावले परंतु तोवर बक-यांचा कळप रेल्वेखाली सापडला. या दुर्देवी अपघातात २७ बक-यांपैकी दहा बक-या जागीच मरण पावल्या तर बारा बक-या गंभीर जखमी होऊन गतप्राण झाल्या.

मात्र सुदिवाणी पाच बक-या बचावल्या असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे गार्डचा अहवाला देत किनवट स्टेशन मास्तर मीना यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी रेल्वे पोलिस निरीक्षक खान यांनी घटनास्थळी जाऊन पहानी केली. बक-याचा कळप चिरडल्याची घटना कळताच परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावल.े आधीच अतिवृष्टीमुळे हैराण असलेल्या शेतकरी पाचपुते यांच्या बक-याचा कळप रेल्वेखाली सापडल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या