31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेड२३६ कोरोना बाधितांना उपचारानंतर सुट्टी

२३६ कोरोना बाधितांना उपचारानंतर सुट्टी

एकमत ऑनलाईन

नांदेड वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात २३६ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर९४ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर टजेन किट्स तपासणीद्वारे ६५ बाधित आले. आजच्या एकुण ९७२अहवालापैकी८३२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १७ हजार ७९२ एवढी झाली असून यातील १५ हजार ३९२ बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण १ हजार ८२० बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील४३ बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात पाच जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवार १४ऑक्टोंबर रोजी बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील ४० वषार्ची एक महिला, लोहा तालुक्यात कलंबर येथील ६०वषार्ची एक महिला यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी रुग्णालयात, बिलोली तालुक्यात डोणगाव येथील ५० वषार्चा एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर १५ ऑक्टोंबर रोजी हदगाव येथील ८०वषार्ची एका महिलेचा हदगाव कोविड केअर सेंटर येथे, समतानगर मुखेड येथील ७० वर्षीय एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या ४६९झाली आहे. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे २ धमार्बाद कोविड केंअर सेंटर ११ नायगाव कोविड केंअर सेंटर ९, मुखेड कोविड केंअर सेंटर१२ हदगाव कोविड केंअर सेंटर ४, लोहा कोविड केंअर सेंटर ५किनवट कोविड केंअर सेंटर८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १२कंधार कोविड केंअर सेंटर ६ अशी रूग्ण संख्या आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १९, अधार्पुर तालुक्यात १ बिलोली १, उमरी 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण१ किनवट १, धमार्बाद १, हिंगोली 2, हैद्राबाद १असे एकुण २९बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३४ अधार्पूर तालुक्यात ५, लोहा १ हदगाव १, बिलोली ३, नायगाव२, उमरी २, नांदेड ग्रामीण १, मुदखेड २, किनवट ४ देगलूर ४, मुखेड १धमार्बाद २, अदिलाबाद 3 असे एकूण ६५बाधित आढळले.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोनामुक्तांची श्रवणशक्ती कमी होतेय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या