22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडऊसास प्रतिटन व्याजासह २७५० रूपये भवा द्या

ऊसास प्रतिटन व्याजासह २७५० रूपये भवा द्या

एकमत ऑनलाईन

हदगाव : सन २०२१ -२२ चा ऊस गळीत हंगाम झाला असून ऊसास जाहिर केलेला प्रतिटन भाव हा तुटपूज असून १५ सप्टेबर पर्यत तो २ हजार ७५० प्रतिटन घोषित करावा अन्यथा न्याय हक्कासाठी श्री सुभाष शुगर कारख्यापूढे आंदोलन करणार असल्याचे निवेदन ऊस उत्पादक शेतकरी वर्गानी साखर कारख्यानास दिले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, ऊस उत्पादक शेतकरी ता. हदगाव व हिमायतनगर, कळमनरी, व उमरखेड या तालक्यातील असून आमचा ऊस आपल्या श्री सुभाष शुगर व शिउर सहकारी साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्यास सन २०२१ – २२ या वर्षातील ऊस गाळपास झाला असून साखर कारखान्याने दोन्ही साखर कारखान्यांस उसाचा अंतिम दर प्रेसनोट व्दारे २४०० रुपये जाहिर केला आहे.

पंरतु ऊसउत्पादकास तो दर मंजूर नसून द.सा.द.शे. १५ टक्के व्याजासहीत दिनांक १५.९.२०२२ पर्यंत २७५०/- रु भाव हा अंतीम एकरकमी कारखानदाराने देण्यासाठी जाहिर करण्यात यावे. आणि तो भाव आमच्या ऊसाला मिळतोच ते देण्यात यावा. त्याकरीता या साखर कारखानदाराने प्रत्यक्ष ऊस उत्पादका समोर चर्चेस दिनांक १२.९.२०२२ रोज चर्चेस तयार राहावे. अन्यथा साखर कारखान्याचे गेटसमोर व साखर कारखान्याच्या कार्यालयास कलूप लावून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल याची साखर कारखानदारांनी नोंद घ्यावी. अशा अशयाचे निवेदन दिले आहे. निवेदनावर गंगाचर कदम, गजानन कदम, सिताराम कदम, ज्ञानेश्वर जाधव, रंगराव वानखेडेव , ज्योतीपाल वाठोरे , गजानन शिंदे , संभाजीराव जामगड, दिनेश आनंदराव तावडे स. तळणी ता. हदगाव , संतोष सुर्यवंशी यांची नावे आहेत. यावेळी पोलिस बंदाबस्त देखिल ठेवण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या