30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडनव्या ३५ कोरोना बाधितांची भर २८ जणांना सुट्टी

नव्या ३५ कोरोना बाधितांची भर २८ जणांना सुट्टी

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना अहवालानुसार ३५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे २६तर टिजेन किट्स तपासणीद्वारे ९ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या २८ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या १ हजार ६२अहवालापैकी १ हजार २१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २२ हजार ५३७एवढी झाली असून यातील २१ हजार ४२२ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ३२६ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १२ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ५८६ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ५, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १० गोकुंदा कोविड रुग्णालय १, कंधार तालुक्यांतर्गत ५ हदगाव कोविड रुग्णालय १माहूर तालुक्यांतर्गत १ खाजगी रुग्णालय५ असे एकूण २८ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ९, भोकर तालुक्यात १, हदगाव १, मुदखेड १, उमरी १, लातूर ३, नांदेड ग्रामीण १ बिलोली १, कंधार १ नायगाव ५, परभणी १, हिंगोली १ असे एकुण २६ बाधित आढळले. अँटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ५, हदगाव तालुक्यात १ भोकर२, माहूर १ असे एकूण ९बाधित आढळले.

जिल्ह्यात ३२६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे ६, मुखेड कोविड रुग्णालय ७, हदगाव कोविड रुग्णालय 2, महसूल कोविड केअर सेंटर १३, किनवट कोविड रुग्णालय ३, देगलूर कोविड रुग्णालय ४ नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण २०४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४०, खाजगी रुग्णालय १२ आहेत. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १६७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे८९ एवढी आहे.

सीमा प्रश्नातील धग अजूनही कायम !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या