19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeनांदेडइतवारा बाजारात २८७ किलो प्लास्टिक, कॅरिबॅग जप्त

इतवारा बाजारात २८७ किलो प्लास्टिक, कॅरिबॅग जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : महापालिकेच्या वजिराबाद झोन अंतर्गत रविवारी इतवारा बाजारात २८७ किलो प्लास्टिक व कॅरिबॅग तसेच नॉनयुज बॅग,प्लस्टिक ग्लास, प्लास्टिक चमचे, इत्यादी साहित्य जप्त केले

आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशावरून सहायक आयुक्त संजय जाधव यांच्या पथकाद्वारे इतवारा बाजारातील हातगाडे चालकांकडून सिंगल यूज प्लास्टिक कॅरिबॅग तसेच नॉनयुज बॅग,प्लास्टिक ग्लास, चमचे इत्यादी २८७ किलोचे साहित्य जप्त करण्यात आलÞे बर्की चौक येथील दिल्ली स्वीटमार्ट चालकास दहा हजार व अली रोड येथील जनता बॅग्स सप्लायर चालकास ५ हजार असा एकूण १५ हजाराचा दंड आकारण्यात आला.

शहरातील व्यावसायिक व नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करून नये, कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉÞ सुनिल लहाने यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या