माहुर : तालुक्यातील मौजे पडसा येथे २६ व्या बौद्ध विवाह मेळाव्यात ७१ आंतरजातीय जोडप्यांसह एकूण ३०३ जोडपी विवाहबद्ध झाली. रमामाता महिला मंडळ तर्फे मौजे पडसा येथे रविवारी (दि. २९) बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
बौद्ध विवाह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदीप नाईक होते. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव व युवा सेनेचे यश खराटे यांच्या हस्ते झाले. या वेळी माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, युवा नेते कपिल नाईक, मनोज कीर्तने, भीमराव भवरे, गोकुळदास वंजारी, अनंतराव केशवे, विनोद राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मुनेश्वर, नगरसेवक प्रतिनिधि रणधीर पाटील, माजी महापौर किशोर भवरे, प्रा.सिद्धार्थ मुर्नेश्वर, विनोद खुपसे, बंटी पाटील जोमदे, देवेंद्र कोवे, किशोर भवरे, सिंदखेडचे पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके, जितेंद्र कांबळे, पडसाचे सरपंच आनंदा किनाके, एस.एस. पाटील, प्रा. विनोद कांबळे, प्रफुल्ल जाधव, अमोल शेंद्रे, सिद्धार्थ तामगाडगे, राहुल पुंडलिकराव भगत यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती
मागील २६ वर्षांपासून पडसा येथे बौद्ध बांधवाचा वेळ ,पैसा व श्रम यांचा अपव्यय टाळण्यासाठी या बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदा आयोजक प्रकाश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नामुळे या बौद्ध विवाह मेळाव्यात आंतरजातीय ७१, हिंदुधर्मीय १०७ व बौद्धधर्मीय १२५ अशी एकूण ३०३ जोडपी विवाहबद्ध झाली.
पडसा येथील सर्व धर्मीय व बौद्ध विवाह मेळाव्याची व्याप्ती पाहता हा आदिवासी दुर्गम भागातील सर्वात यशस्वी मेळावा असल्याचे मत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले. विवाह मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजक प्रकाश गायकवाड यांच्यासह संयोजन समितीचे अध्यक्ष कुमार कांबळे, उपाध्यक्ष सुनील शेंडे, सचिव प्रदीप भगत, सहसचिव जितेंद्र शेंडे, निमंत्रक राहुल भवरे, संघटक विष्णू शेंडे, कोषाध्यक्ष उत्तम मुनेश्वर, सहकोषाध्यक्ष संतोष उमरे, कार्याध्यक्ष सम्यक भवरे, शशिकांत भगत, गौतम मुनेर्श्वर, मारोती कांबळे यांच्यासह डॉ. सत्यम गायकवाड यांनी परिश्रम घेतले. मेळाव्याला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.