24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडरेल्वेतील नोकरीसाठी ३३ लाखांना गंडविले

रेल्वेतील नोकरीसाठी ३३ लाखांना गंडविले

एकमत ऑनलाईन

नांदेड : अनेक जणांना मध्यरेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून ३२ लाख ९० हजार रूपयांचा गंडा घालणा-या ३ जणांविरुध्द भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एका व्यवस्थितपणे चालणा-या रॅकेटने सन २०१६ ते २०१९ दरम्यान राज कॉर्नर नांदेड, नागपूर, मुंबई येथे नांदेड जिल्ह्यातील अनेकांना मध्यरेल्वेमध्ये तृतीय आणि चतुर्थश्रेणी वर्गात नोकरी लावतो म्हणून अनेकांकडून रक्कम घेत ३२ लाख ९० हजार रुपयांना गंडवले.

दिलेले आदेश हे बोगस होते. त्यानंतर रामेश्र्वर गोविंदराव चिटगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सागर लक्ष्मण राठोड, जनार्धन रामदास पवार आणि राजेंद्रप्रसाद तिवारी या तिघांविरुध्द गुन्हा कलम ४२०, ४६७, ४६८ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या