नांदेड : चाचण्या वाढताच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येतही वाढ होत आहे.मागील आठवड्यात बाधितांचा आलेख वाढला होता. रविवारीचा दिवस थोडासा दिलासादायक ठरला. रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ५४ रुग्ण कोरोनामुक्त आहेत. तर उपचार घेणा-या एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २० हजार ३६० एवढी झाली आहे.
एकुण १ हजार ५४७ अहवालापैकी १ हजार ४९३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २० हजार ३६० एवढी झाली असून यातील १९ हजार २३४ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ३८४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील १४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शनिवार २८ नोव्हेंबर रोजी दत्तनगर नांदेड येथील ५१ वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविडमुळे जिल्ह्यातील ५४९ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ५, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १४, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण २, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १६, नायगाव तालुक्यांतर्गत २, खाजगी रुग्णालय १५ असे एकूण ५४ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.४६ टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ६, अधार्पूर तालुक्यात ३, मुखेड ३, लोहा ३, हिंगोली १ असे एकुण १६ बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ९, कंधार तालुक्यात २, मुदखेड २, लातूर १, किनवट २, मुखेड २, परभणी १ असे एकुण १९ बाधित आढळले. जिल्ह्यात ३८४ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ३२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे २७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे ४१, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण १८, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ५, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ८, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण ११, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ८३, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १२४, खाजगी रुग्णालय ३५ आहेत.
रविवार २९ नोव्हेंबर २०२० रोजी ५ वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे १७१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ६५ एवढी आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार ३२९ संशयीतांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यात १ लाख २५ हजार ८४८ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर जिल्ह्यातील एकुण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २० हजार ३६० वर पोहचली आहे. यातील औषधोपचाराने बरे झालेल्या १९ हजार २३४ बाधितांना रूग्णालयातुन घरी सुट्टी देण्यात आली आहे. असे असले तरी मागील १० ते १५ दिवसात कोरोना चाचणीची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांचीही संख्या वाढलेली दिसत आहे. यात रविवारी आलेल्या अहवालामुळे काहीसाा दिलासा मिळाला आहे.
आले विभागीय आयुक्तांच्या मना… तेथे कोणाचे चालेना