23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडदुकान फोडून ४ लाखांच्या टायर्सची चोरी

दुकान फोडून ४ लाखांच्या टायर्सची चोरी

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : शहरातील देशमुख कॉम्प्लेक्समध्ये असलेले टायर्सचे दुकान फोडून चोरट्यांनी ३ लाख ८४ हजार रुपयांचे टायर चोरून नेल्याची घटना घडली़या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्धापूर-नांदेड रोडवरील स्वराज बारच्या समोर देशमुख कॉम्प्लेक्समध्ये विनायक टायरचे दुकान असून गुरूवारी रात्री बाजूच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.

यानंतर दुकानातील अपोलो, एमआरएफ आयचर,बोलोरो,पिकपसह ३ लाख ८४ हजार २८२ रूपयांचे अनेक टायर चोरटयांनी चोरून नेले़ या प्रकरणी दुकानाचे मालक गजानन रूख्माजी पिंपळगावकर यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री अधार्पूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक अशोक जाधव, पोउपनि कपील आगलावे, पोउपनि म.तय्यब यांना दिल्या़या चोरीचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या