28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडजिल्ह्यात ४० बाधितांची भर तर ४ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ४० बाधितांची भर तर ४ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड :कोरोनाबाधितांची संख्या बुधवारी काहीशी घटली आहे.सायंकाळी साडे पाच पर्यंत आलेल्या अहवालानूसार ४० बाधितांची भर पडली आहे़ चार जणांचा मृत्यू झाला आहे़तर २० व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या एकूण २४२ अहवालापैकी १७९ अहवाल निगेटिव्ह आले. तर ४० जण बाधित आले आहेत़ जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १ हजार ४६९ एवढी झाली असून यातील ७९० एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण ६९३ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १५ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ७ महिला व ८ पुरुषांचा समावेश आहे.

सोमवार २७ जुलै रोजी दिपनगर नांदेड येथील ५८ वर्षाचा एक पुरुष, मंगळवार २८ जुलै रोजी किनवट कलारी येथील ५४ वर्षाचा एक मजुर, शेतमजूरवाडी तामसा येथील २५ वर्षाच्या एका महिलेचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावली. तर बुधवार २९ जुलै रोजी सराफा गल्ली येथील ७० वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या ७४ एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या २० बाधितांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील ९, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील १, खाजगी रुग्णालयातील १० बाधितांचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण ७९० बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये श्रीनगर नांदेड येथील ६३ वर्षाची १ महिला, फारुकनगर नांदेड येथील ४४ वर्षाचा १ पुरुष, जवाहरनगर नांदेड येथील ३२ वर्षाचा १ पुरुष, शिवकल्याणनगर नांदेड येथील ६५ वर्षाचा १ पुरुष, दिलीपसिंग कॉलनी गोवर्धन घाट नांदेड येथील ७,१०, १२,३०,३१,३३ वर्षाचे ६ पुरुष व २६ वर्षाचा १ महिला, मगनपुरा नांदेड येथील ३३ वर्षाचा १ पुरुष, वसंतनगर नांदेड येथील ३४,३७,४६ वर्षाचे ३ पुरुष, शिवाजीनगर नांदेड येथील १६ वर्षाचा १ पुरुष व ६० वर्षाची 1 महिला, दिपकनगर नांदेड येथील ६८ वर्षाचा १ पुरुष, वजिराबाद नांदेड येथील ५० वर्षाचा १ पुरुष, पाठक गल्ली नांदेड येथील २०,२१ वर्षार्चे २ पुरुष, किनवट येथील ४८ वर्षाचा १ पुरुष, कलारी किनवट येथील ६५ वर्षाचा १ पुरुष, एसव्हीएम कॉलनी किनवट ेयेथील ५२,६० वर्षार्चे २ पुरुष, आंध्र बस स्टँड धमार्बाद येथील ७0,७५ वर्षाच्या २ महिला, करिम कॉलनी आधार्पूर येथील ६0 वर्षाचा १ पुरुष, शेतमजूर वाडी तामसा हदगाव येथील २५ वर्षार्ची १ महिला, हेतेपूर कंधार येथील ३६,४२ वर्षाच्या २ महिला, नवीन मोंढा परभणी येथील १८ वषार्ची १ महिला, हिंगोली येथील ४0 वर्षाचा १ पुरुष, कळमनूरी हिंगोली येथील ५७ वषार्चा १ पुरुष, पुसद यवतमाळ येथील ३८ वर्षाच्या एका पुरुषाचा यात समावेश आहे. तर अँटिजेन तपासणीद्वारे भाग्यनगर नांदेड येथील २१,२८ वषार्चे २ पुरुष, कौसरनगर चुनाभट्टी नांदेड येथील २३ वषार्चा १ पुरुष, बोरबन वजिराबाद नांदेड येथील ४४ वर्षाच्या एका पुरुषाचा यात समावेश आहे. जिल्ह्यात ६९३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेडयेथे ११७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २४९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे २७, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १५, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १४, मुखेड कोविड केअर सेंटर येथे १०६, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ५६, उमरी कोविड केअर सेंटर १०, लोहा कोविड केअर सेंटर येथे ५, हदगाव कोविड केअर सेंटर १३, भोकर कोविड केअर सेंटर २, कंधार कोविड केअर सेंटर येथे १०, धमार्बाद कोविड केअर सेंटर येथे १७, किनवट कोविड केअर सेंटर येथे ३, खाजगी रुग्णालयात ४३ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ४ बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे १ बाधित तर मुंबई येथे १ बाधित संदर्भित झाले आहेत.

Read More  आमदार अबू आझमी संतप्त : ऑनलाईन बकरे खरेदी करणार कसे?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या