21.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home नांदेड साडेचौदा कोटींच्या हॅकिंग प्रकरणात ५ जण ताब्यात

साडेचौदा कोटींच्या हॅकिंग प्रकरणात ५ जण ताब्यात

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरातील वजिराबाद परिसरात असलेल्या आयडीबीआय बँकेच्या शाखेतून शंकर नागरी सहकारी बँकेच्या खात्यातील १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून अज्ञात हॅकरने परस्पर वळते करुन घेतले होते. या प्रकरणात नांदेड पोलिसांनी दिल्लीत जाऊन सोमवारी (दि.१८) संशयितास तर बुधवारी (दि.२०) आणखी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. सर्वांची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय बँकेतील खात्यातून मोठी रक्कम आॅनलाईन पद्धतीने हॅक करुन चोरण्यात आली होती. या प्रकरणात तपासादरम्यान सीमावर्ती भागातील काही लोकांचा यात सहभाग असल्याचे समजल्यानंतर पथकाने दिल्ली येथून एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेतले. हे पथक गुरुवारी (दि. २१) नांदेडला आले. कर्नाटकच्या शेजारी असलेल्या नांदेड लगतच्या एका जिल्ह्यातून एक महिला दुस-या पथकाने ताब्यात घेतली असून तिच्या दुसºया सहकारी महिलेलाही ताब्यात घेतले आहे. या महिलेचे नायजेरियन फ्रॉड करणा-या अनेक लोकांची घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा आहे. ही महिला एका शाळेतील मुख्याध्यापिका असल्याचे सांगितले जाते.

 

‘सीरम’ची अग्निपरीक्षा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या