कुंडलवाडी : कुंडलवाडी शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची वाढती संख्या लक्षात घेवून व रूग्ण दगावत असल्यांचा पार्श्वभूमीवर पालीका प्रशासन,आरोग्य प्रशासन,पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, व्यापारी व सर्व समाजबांधवांचा पुढाकाराने न.प.अध्यक्ष डॉ.विठ्ठल कुडमूलवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करून सवार्नुमते स्वयंघोषीत दि.१७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर पर्यंत ५ दिवसाचा कोरोना चैनब्रेक जनता कर्फ्यू घोषीत करण्यात आले.
या बैठकीत शहराती मुख्यबाजारा सहीत गल्ली बोळीतील सर्व दुकाने व व्यवसाय पुर्णता बंद ठेवण्यात येणार,अत्यावश्यक सेवेचा नावाने फक्त मेडीकल व रूग्णालय चालू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आले.तरी शहरातील सर्व समाजबांधव,व्यापारी आपले व आपल्या परिवारातील व गावातील नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी ५ दिवसाचा कोरोना चैनब्रेक जनता कर्फ्यूत १००% यशस्वी पाळावे व सर्व व्यापार बंद ठेवून सहकार्य करावे असे अहवान न.प.अध्यक्ष डॉ.विठ्ठल कुडमूलवार,मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी केले.
यावेळी डॉ.बालाजी सातमवाड यांनी उपस्थितांचे ऑक्सिजनचे प्रमाण,उष्णतेचे प्रमाणाची तपासणी केले.या बैठकीत नगरसेवक पंढरी पुपलवार,सय्यारेड्डी पुपलवार,अशोक पा.वानोळे,सचीन कोटलावार,नरेश जिठ्ठावार,पोशट्टी पडकुटलावार,शहराध्यक्ष शेख जावेद,हणमंलू ईरलावार, सराफा व्यापारी असोसिएशन अध्यक्ष दत्तूसेठ -याकावार, किराणा असोसिएशन अध्यक्ष दिनेशसेठे दाचावार,कृषी असोसिएशन अध्यक्ष विलास दिवशीकर, कापड असोसिएशन अध्यक्ष प्रतिनिधी सुबोध दाचावार,बंडूसेठ मुनगीलवार, पोतलिंग शक्करकोट, शेख खदीर, काशिनाथ बाबळीकर, संजय उत्तरवार, शेख फेरोज, बालाजी झंपलकर, पत्रकार नागोराव लोलापोड, वसंत मदीकुटावार, पोलिस प्रशासन प्रतिनिधी गजानन अनमुलवार, न.प.लिपीक गंगाधर पत्की, धोंडीबा वाघमारे,शुभम ढिलोड, बिल्लावार सह मोठ्या प्रमाणात व्यापारी नागरीक उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळात राज्यात कोविड संदर्भात २ लाख ५५ हजार गुन्हे २५ कोटी ८ लाख रुपयांची दंड आकारणी