34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeनांदेड५ हेक्टर ५५ आर गायराण जमीन शेतक-यांच्या नावावर

५ हेक्टर ५५ आर गायराण जमीन शेतक-यांच्या नावावर

एकमत ऑनलाईन

धर्माबाद (माधव हनमंते) : तालुक्यातील मौजे पाटोदा (बु) येथील शिवारात असलेली गट क्रमांक १८६ मधील ५ हेक्टर ५५ आर गायराण जमीन तात्कालीन तलाठी,मंडळ अधिकारी व संबंधित शेतक-यांनी संगनमत करून आपल्या नावावर करून घेतल्याचे उघडकीस आले असून सदरील प्ररकरणातील दोषी असलेल्या तात्कालीन तलाठी,मंडळ अधिका-यावर कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी माधव हनमंते यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धमार्बाद तालुक्यातील मौजे पाटोदा (बु) येथील शिवारात असलेले गट क्रमांक १८६ मधील ५ हेक्टर ५५ आर गायराण जमीन तात्कालीन तलाठी,मंडळ अधिकारी व संबंधित शेतक-यांनी संगनमत करून आपल्या नावावर करून घेतल्याचे उघडकीस आल्यामुळे महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आल्यामुळे तालुक्यातील जनतेत महसूल प्रशासनात असलेल्या भ्रष्ट तलाठी व मंडळ अधिका-यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

तालुक्यातील बहुतांश तलाठी संबंधित सज्यावर उपस्थित राहत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी,व्यापारी व शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुले व मुलींना लहान मोठ्या कामासाठी तलाठी कार्यालयाकडे अनेकवेळा खेटे मारावे लागत आहे.तसेच सदरील गट क्रमांक १८६ हि जमीन यापूर्वी गायराण जमीन असल्याचे उल्लेख गाव नकाशा मध्ये होते.व भूमी अभिलेख कार्यालयात सुध्दा सदरील जमीन गायराण असल्याचे टोच नकाशावर उल्लेख आहे.तसेच सदरील गट क्रमांक १८६ मधील गायराण जमीन अनेक शेतक-यांच्या नावावर करण्यात आले आहे.व संबंधित शेतक-्यांच्या नावांचा उल्लेख सातबारावर आहे.सदरील गायराण जमीनीतून उर्ध्व पेनगंगेचा कालव्याचे काम सुरू आहे.व कालव्यामध्ये गेलेल्या जमीनीजा मावेजा मिळावा, म्हणून संबंधित शेतकरी धडपड करीत असल्याचे चित्र दिसत आहेत.

त्यामुळे शासनाची फसवणूक करणा-या तात्कालीन तलाठी व मंडळ अधिका-यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडे माधव हनमंते यांनी केली होती.सदरील तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.व सदरील प्ररकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.शासनाचे रक्षकच भक्षक झाले असल्याचे उघडकीस आल्यामुळे वरीष्ठ अधिका-यांनी दोषी असलेल्या तात्कालीन तलाठी व मंडळ अधिका-यावर कठोर कारवाई करतील काय?याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.

यासंदर्भात पाटोदा (बु) येथील कार्यरत असलेले तलाठी भालचंद्र कदम यांना भ्रम्नधव्नीवरून विचार पुस केल्यास म्हणाले की,सदरील प्ररकरणाची चौकशी करण्यात आली आहे.व चौकशी अहवाल तहसिलदार यांना देण्यात आले असून सदरील गट क्रमांक १८६ हे यापूर्वी गावा नकाशावर गायराण जमीन असल्याचे उल्लेख आहे.व पुढील कारवाई वरीष्ठ अधिकारी करतील,असे दै.एकमतशी तलाठी कदम बोलताना सांगितले आहे.

उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या