30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home नांदेड नांदेड परिमंडळात ५ हजार २६६ कोटी रूपये थकले

नांदेड परिमंडळात ५ हजार २६६ कोटी रूपये थकले

एकमत ऑनलाईन

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडळात ५ हजार २६६ कोटी रूपयांचा डोंगर ग्राहकांकडे थकला आहे. यामुळे महावितरणने वसुली मोहिम हाती घेतली आहे. थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करावे अन्यथा वीज खंडीत करण्यात येईल असा इशारा महावितरणे दिला आहे. डिसेंबर २०२० अखेर राज्यात एकूण ६३ हजार ७४० कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही. डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ४९८ कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे ८४८५ कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे २४३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये कोविडमूळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व राज्याचे उजार्मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.

मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात खाजगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन सप्टेंबर २०२० मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला. मात्र राज्याचे उजार्मंत्री डॉ राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचा-यांचा पगार देणेही अशक्य झाले आहे. नांदेड परिमंडळात डिसेंबर २०२० अखेर घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्ब्ल ५३५ कोटी ४७ लाख रुपये थकले आहेत.

त्याचबरोबर कृषीपंप वीजग्राहकांकडे ४ हजार १0७ कोटी ५६ लाख रूपयांची थकबाकी आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १0६ कोटी २९ लाख तर पथदिवे वीजग्राहकांकडे ५१२ कोटी ३९ लाख रुपए अशाप्रकारे एकूण ५ हजार २६६ कोटी २६ लाख रुपए थकीत आहेत. नांदेड परिमंडळांतर्गत येणा-या परभणी जिल्हयातील सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांकडे १ हजार ८३८ कोटी ६0 लाख रुपये तर हिंगोली जिल्हयातील सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांकडे १ हजार २५९ कोटी १८ लाख रुपए त्याचबरोबर नांदेड जिल्हयातील सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांकडे २ हजार १६८ कोटी ४८ लाख रुपये थकीत आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करावे अन्यथा वीज खंडीत करण्यात येईल असा इशारा महावितरणे दिला आहे.

जय हो यंगिस्तान !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या