22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeनांदेडदरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ तरुणांना पकडले

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ तरुणांना पकडले

एकमत ऑनलाईन

किनवट : पोलिस व दरोडा पेट्रोलिंग पोलिसाना गोकुंदा येथील इदगा मैदानाच्या बाजुस एका टाटा सुमो गाडीत शस्त्रासह गाडीत दरोडा टाकण्याच्या तयारीत काही तरुण असल्याची गुप्त माहिती दिनांक २९ जुलै रोजी ११ वाजता मिळताच पोलिसानी शिताफीने ५ तरुणाना ताब्यात घेवून त्यांच्या जवळील ३ तलवारी, एक लोखंडी रॉड पाच मोबाईल , मिरची पावडर दोरी व एक टाटा सुमो जिप असा एकूण ३ लाख २९ हजार १०० रुपयाचा मुदेमाल पोलिसानी ताब्यात घेतला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून आज न्यायालयात हजर केले असता त्याना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दिनांक २९ रोजी रात्री किनवट पोलिस व दरोडा पेट्रोलिंग पोलीस यांना पेट्रोलिंग करताना गोकुंदा येथील इदगा मैदानाच्या बाजूस एम. एच. ३४ ए ए ९६६४ क्रमांकाची टाटा सुमो गाडी व त्यात शस्त्र धारी तरुण असलेल्याची गुप्त माहीती मिळताच सापळा रचून त्या ठिकाणी पोलिसानी रेड टाकली. त्यात विकास कुमार डी रिजन यादव वय २० वर्षे रा . सोमनाथपूर साईनगर राजुरा जिल्हा चंदपूर , प्रज्वल राजकुमार वनकर वय २३ वर्षे रा. मुदुली जि . गडचिरोली , अविनाश शंकर कुशन पल्लीवार वय २२ वर्षे रा. सोमनाथपूर साईनगर राजुरा जि . चंद्रपूर, लबजोत्सिग हरदेव सिंग देवल वय २० वर्षे रा . सोमनाथपूर साईनगर राजुरा जि. चंद्रपूर, संतोष भारत परसावय २२ व्यवसाय बेकार रा . राजुरा जि. चंद्रपूर या पाच आरोपीस शस्त्रासह रात्री ११ वाजता किनवट पोलिसानी दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असताना पकडले सदर आरोपी नांदेड, हदगाव ,उमरखेड, मार्ग किनवट आल्याचे सांगत आहेत.

त्यांच्या जवळील ३ तलवारी, एक लोखंडी रॉड पाच मोबाईल , मिरची पावडर दोरी व एक टाटा सुमो जिप असा एकूण ३ लाख २९ हजार १०० रुपयाचा मुदेमाल पोलिसानी ताब्यात घेतला तर आरोपी आशिष एकनाथ जाधव रा.सोमनाथपूर साईनगर राजुरा जिल्हा चंद्रपूर हा पळून गेलेला आहे.त्यांच्या विरुद्ध गु.र.नं.१५१ / २०२२ कलम ३९९ भा .द.वी . सह कलम ४ / २५ भा . ह .का . प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन तपास पो. नि. अभिमन्यू साळूंखे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनीरीक्षक पवार हे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या